२० डिसेंबर
फोर्ब्स इंडियाने प्रसिद्ध केलेल्या ‘Celebrity 100’ यादीमध्ये क्रिकेटपटू विराट कोहलीनं सलमान खानला मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं आहे. अक्षय कुमार दुसऱ्या स्थानावर आल्यामुळे या यादीमध्ये सलमान खान आता तिसऱ्या क्रमांकावर आहे.
संगीतकार अजय अतुल यांचा भारतातल्या 100 सेलिब्रिटींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत ते 22 व्या क्रमांकावर आहेत. शंकर एहसान लॉय, शाहिद कपूर, करण जोहर, यांना मागे टाकून ते 22 व्या क्रमांकावर झळकले आहेत. माधुरी दिक्षीतचाही समावेश या यादीत आहे. तिचा 57 वा क्रमांक आहे. धडक, सुपर 30, पानिपत आणि आगामी ‘तान्हाजी’ या हिंदी चित्रपटांना संगीत देऊन अजय अतुल या जोडीने बॉलिवुडमध्ये हे वर्ष गाजवलं. फोर्ब्सच्या माहिती नुसार त्यांची या वर्षीची कमाई 78 कोटी रुपये इतकी आहे.