भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लग्न बंधनात अडकला आहे. स्टार अॅंकर आणि मॉडेल संजना गणेशनशी तो विवाहबद्ध झाला आहे. जसप्रीतने सोशल मीडियावर लग्नातील फोटो शेअर करत सर्वांना धक्का दिला आहे.
जसप्रीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने ‘आम्ही आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आजचा दिवस हा आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवसांपैकी एक आहे. आम्ही लग्न केले हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे’ या आशयाचे कॅप्शन त्याने दिले आहे.
कोण आहे जसप्रीतची पत्नी संजना?
संजना गणेशन ‘स्प्लिट्स व्हिला ७’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. या शोने तिला लोकप्रियता मिळवून दिली होती. संजना टीव्ही प्रेझेंटर होण्याआधी एक मॉडल होती. संजनाने ‘फेमिना ऑफिशियली गॉर्जियस’ हा किताब जिंकला होता. त्यानंतर २०१२ मध्ये तिने ‘फेमिना स्टाइल दिवा’मध्ये भाग घेतला होता. २०१४ मध्ये संजना ‘फेमिना मिस इंडिया पुणे’ या स्पर्धेची फायनलिस्ट ठरली होती. संजनाने २०१९मध्ये क्रिकेट विश्वचषकात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर ‘मॅच पॉईंट’ आणि ‘चिक सिंगल’ या शोचे सुत्रसंचालन केले होते.