Sunday, July 20, 2025
Homeताजी बातमीअपक्ष उमेदवार तुषार उर्फ वेंकटेश जयसिंग गाडे यांना बॅट चिन्हा समोर शिक्का...

अपक्ष उमेदवार तुषार उर्फ वेंकटेश जयसिंग गाडे यांना बॅट चिन्हा समोर शिक्का मारून बहुमताने विजयी करा ; पथारी, हातगाडी, टपरीधारकांना आवाहन

सर्वेक्षणाला विरोध, फॉर्मसाठी साडेतीन हजार रुपये,उमेदवारीसाठी दोन लाख रुपये घेणाऱ्यांचे पॅनल निवडणूकीत पाडा – तुषार उर्फ वेंकटेश जयसिंग गाडे

सुरुवातीला हातगाडी, पथारी धारकांच्या सर्वेक्षणाला विरोध कालांतराने त्यांच्याकडून विविध संघटनांनी फॉर्म भरून घेण्यासाठी तीन हजार रुपये,उमेदवारी देण्यासाठी दोन लाख रुपये घेणाऱ्यांच्या पॅनलला पिंपरी चिंचवड महानगरपालिका पथविक्रेता समिती निवडणूक २०२४ मध्ये पाडा व त्यांच्या हितासाठी लढणाऱ्या अपक्ष उमेदवार तुषार उर्फ व्यंकटेश जयसिंग गाडे यांना बॅट चिन्हा समोर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन वेंकटेश जयसिंग गाडे यांनी शहरातील कष्टकरी वर्ग, पथारी, हातगाडी, टपरीधारकांना केले आहे. ते घरोंदा हॉटेल येथे (दि.१८) बोलत होते.

यावेळी गाडे म्हणाले की, शहरातील पथारी, हातगाडी, टपरीधारकांच्या सर्वेक्षणाला विरोध करून विविध संघटना न्यायालयात गेल्या होत्या. महानगरपालिकेने ४० हजार नागरिकांना परवानगी दिलेली असताना संघटनेच्या विरोधामुळे ५ हजार नागरिकांनी कागदपत्रे दिली नाहीत. खूप नागरिक वंचित असून परत सर्वेक्षण करणे खूप गरजेचे आहे. येणाऱ्या काळात सर्वेक्षण पुर्ण करून हॉकर झोन तयार करणार असून त्यामध्ये गरिबांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्या ठिकाणी हातगाडी,पथारी धारकांच्या व्यवसायाला पूरक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असेल. अतिक्रमण कारवायावर निर्बंध लावून कायद्याच्या चौकटीत राहून कारवाया करण्यासाठी महानगरपालिकेला मजबूर करणार आहोत. आमदार, नगरसेवक, महापौर व धनदांडग्यांचे गाळे आहेत. परंतु त्यांच्याकडे परवाना नसून ते कर भरत नाहीत. आमदाराला हाता खाली धरून खाऊ गल्ली सारखे हॉकर झोन तयार केले जात असून यामध्ये गरिबांना डावलले जात आहे. विवीध संघटनेच्या विरोधामुळे राहिलेले सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी व गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.

शहरातील गोरगरीब हातगाडी, पथारी, टपरीधारकांच्या विकासासाठी महानगरपालिकेला दरवर्षी ५४ कोटी रुपये भेटत असतात. परंतु हॉकर झोन व संघटनांची एकी नसल्यामुळे तो निधी स्थापत्य विभागाकडे वळवल्या जातो त्यामुळे हातगाडी, पथारी वाल्यांचा विकास थांबला आहे. येणाऱ्या काळात तो निधी योग्य प्रकारे खर्च होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. सर्वेक्षण होऊन सर्वांना परवाने भेटणे अपेक्षित होते. परंतु विवीध संघटनाच्या विरोधामुळे तीन वर्ष विलंब झाला आहे. यामुळे निवडणुकीत बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वेक्षणाचा विरोध विविध संघटनांनी स्वतःच्या फायद्यासाठी केला परंतु न्यायालयाने अंतिम निकाल हा महानगरपालिकेकडून दिला आहे. अनेक संघटनांनी पन्नास रुपयांच्या फॉर्म ऐवजी साडेतीन हजार रुपये घेऊन गरिबांची लूट व दिशाभूल केली आहे. उमेदवारी देण्यासाठी ही दोन लाख रुपये घेतले असून याचे उत्तर हातगाडी, पथारी ,टपरीधारक हे आपल्या मतदानातून देतील.

महानगरपालिकेने नियुक्त केलेली संस्था ही योग्य प्रकारे काम करत असून विरोधक स्वतःच्या फायद्यासाठी व्यत्यय आणत आहेत. संघटने कडून वंचित राहिलेल्या लोकांचे करायचे काय? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. येणाऱ्या काळात हॉकर झोन निर्माण करून सर्व लाभार्थ्यांना लाभ देणार आहे. महानगरपालिकेच्या जवळच्या शाळेत पथविक्रेता समिती २०२४ चे मतदान रविवार दिनांक २० ऑक्टोबर २४ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे. गेली अनेक वर्ष झाले हातगाडी पथारी टपरीधारकांसाठी लढा देत असून येणाऱ्या काळातही खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत उभा राहणार असुन गाडे यांनी जास्तीत जास्त मताने निवडून देण्याचे आवाहन नोंदणीकृत हातगाडी, पथारी, टपरीधारकांना केले आहे.

या वेळी विवेक विधाते,अजय पिल्ले, विशाल जाधव,शौल कांबळे ,अमित कीवळे,गजानन पवार,सदाशिव रसाळ, मुकेश रसाळ,सुशांत उरासनी,दिनेश पाटील,नितीन मोरे, गणेश भांडवलकर,तुषार तांबे डॉक्टर काशिनाथ बामणे,सचिन गायकवाड,अक्षय काटे पाटील,संदीप निर्मल,राहुल नेवाळे व हातगाडी, पथारी, टपरीधारक आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments