पिंपरी चिंचवडमध्ये अनेक ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले स्पा सेंटर संदर्भात धक्कादायक बाब समोर आली आहे. या स्पा सेंटरच्या आडून स्पामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्या नंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून हा छापा टाकला. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय थाटण्याचे प्रकार समोर येत आहे. पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू वसाहतीत असलेल्या या स्पा सेंटरच्या कारवाईने संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे. Neung Thai नावाच्या स्पा सेंटरमध्ये स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी मुलींकडुन पैश्याचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती समोर येत होती.
या प्रकरणी ओमकार विनायक जोशी ऊर्फ सत्यम गौडा (वय २४ ) रा.घर नं. १० म्हात्रे ब्रिजजवळ, अजिंठा बिल्डींग, पहिला मजला, दत्तवाडी पुणे. मुळ पत्ता. रुम नं ४ कॉलर बिल्डींग, राणीबाग, नंदराम वैभव गोविंद ( वय ३१ ) यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत तब्बल ३४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.