Wednesday, May 14, 2025
Homeक्रिडाविश्वIND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; 'या' खेळाडूला काढलं बाहेर

IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; ‘या’ खेळाडूला काढलं बाहेर

भारत-इंग्लंड पहिल्या कसोटीत इंग्लंडने दणदणीत विजय मिळवला. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना उद्यापासून चेन्नईच्या मैदानावर सुरू होणार आहे. या सामन्याआधी इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट याने आज एक पत्रकार परिषद घेऊन संघातील बदलांबद्दल माहिती दिली. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. पण त्याचसोबत पहिल्या कसोटीत डाव पलटवणारा जेम्स अँडरसन यालाही संघातून बाहेर करण्यात आलं आहे.

वाचाः दिल्लीत भाजपा कार्यकर्त्याची घरात घुसून निर्घृण हत्या, हत्येचे कारण अस्पष्ट

जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसन या दोघांच्या जागी संघात स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्स या दोन वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. पहिल्या कसोटीत उत्तम कामगिरी करत पाच गडी मिळवणाऱ्या फिरकीपटू डॉम बेस यालाही संघाबाहेर करण्यात आलं असून मोईन अलीला संघात स्थान देण्यात आलं आहे. दमदार फलंदाज जोस बटलर यालाही संघातून वगळ्यात आलं आहे. बेन फोक्स आणि ओली स्टोन या दोन नव्या खेळाडूंना संघात स्थान दिलं आहे.

असा असेल इंग्लंडचा १२ खेळाडूंचा संघ

जो रूट (कर्णधार), रॉरी बर्न्स, डॉम सिबली, डॅन लॉरेन्स, बेन स्टोक्स, ओली पोप, मोईन अली, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स, बेन फोक्स आणि ऑली स्टोन.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments