Saturday, March 2, 2024
Homeमुख्यबातम्याशहरातील तीन बड्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे

शहरातील तीन बड्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे

आयकर विभागाने पिंपरी-चिंचवड मधील तीन बड्या बांधकाम व्यावसायिकांच्या घरावर आणि कार्यालयावर गुरुवारी (दि. 23) छापे मारले. ही कारवाई अजूनही सुरु असून नेमकी कोणत्या प्रकरणात कारवाई सुरु आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समजू शकली नाही.

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी येथे रहाणा-या एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरी गुरुवारी सकाळी आयकर विभागाची वाहने दाखल झाली. अधिकाऱ्यांनी घराची झडती घेत तपासाला सुरुवात केली. दरम्यान, त्याच वेळी त्या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात देखील आयकर विभागाचे पथक दाखल झाले. घरासह कार्यालयात देखील आयकर विभागाची कारवाई सुरु आहे.

त्याचबरोबर आयकर विभागाने गुरुवारी वाकड आणि किवळे येथील बांधकाम व्यावसायिकांवर देखील कारवाई केली आहे. यामध्ये आयकर विभाग कोणत्या प्रकरणाची चौकशी करत आहे, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

शहरात एकाच दिवशी तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने कारवाई केल्याने अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारवाईचे लोन आपल्यापर्यंत कधी येईल हे सांगता येत नाही, अशी चर्चा बांधकाम व्यावसायिकांसह बड्या उद्योजकांच्या मध्ये सुरु आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments