Friday, September 20, 2024
Homeअर्थविश्वपुण्यातील सिटी ग्रुपचे अनिरुद्ध देशपांडेंच्या कार्यालयावर Income Tax विभागाची धाड

पुण्यातील सिटी ग्रुपचे अनिरुद्ध देशपांडेंच्या कार्यालयावर Income Tax विभागाची धाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आयकर विभागाने पुण्यात एकूण सहा ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयाचाही समावेश आहे. आता या धाडसत्रातून काय निष्पन्न होणार, ते पाहावे लागेल. अनिरुद्ध देशपांडे हे शरद पवारांच्या जवळच्या वर्तुळातील असल्याने आयकर विभागाच्या कारवाईकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान आयकर विभागाने मंगळवारी बीबीसी वृत्तसंस्थेच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांमध्ये सर्वेक्षण केले होते. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर आज आयकर विभागाकडून पुण्यात छापे टाकण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments