Wednesday, December 6, 2023
Homeगुन्हेगारीपिंपरीतील घटना: महिलेचा खून करून दागिन्यांची चोरी

पिंपरीतील घटना: महिलेचा खून करून दागिन्यांची चोरी

महिलेच्या अंगावरील दागिने घरातल्या कपाटातील सोन्याचे दागिने व मोबाइल फोन आरोपीने चोरी केले

अज्ञात इसमाने घराचे सिमेंटचे पत्रे तोडूनफोडून घरात घुसून वृद्ध महिलेचा खून केला. तसेच घरातील एक लाखाचे दागिने चोरून नेले. सॅनेटरी चाळ, पिंपरी रेल्वे स्टेशनजवळ, पिंपरी येथे ३० जुलै रोजी रात्री साडेदहा ते ३१ जुलै रोजी सकाळी साडेदहा या कालावधीत ही घटना घडली.

याप्रकरणी एका महिलेने शनिवारी (दि. ५) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ८५ वर्षीय महिलेच्या घराचे सिमेंट पत्रे तोडूनफोडून घरात शिरला. त्यानंतर घरात असलेल्या महिलेच्या डोक्‍यात कठीण वस्तूने प्रहार करून आरोपीने तिला जीवे ठार मारले. तिच्या अंगावरील तसेच घरातल्या कपाटातील चार तोळे वजनाचे एक लाख चार हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व मोबाइल फोन आरोपीने चोरी करून नेला, असे फिर्यादीत नमूद आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments