Sunday, July 14, 2024
Homeआंतरराष्ट्रीयरशियन हल्ल्यात.. ल्विव्ह शहरातील अपार्टमेंटच्या इमारतीवर चार जण जागीच ठार व 30...

रशियन हल्ल्यात.. ल्विव्ह शहरातील अपार्टमेंटच्या इमारतीवर चार जण जागीच ठार व 30 हून अधिक घरे उद्ध्वस्त ..

पश्चिम युक्रेनमधील ल्विव्ह येथे एका अपार्टमेंट इमारतीला रशियन रॉकेटने धडक दिल्याने २१ आणि ९५ वयोगटातील दोन महिलांसह किमान चार जण ठार झाले आहेत.ल्विव्ह शहरातील हा “सर्वात मोठा हल्ला” म्हणून वर्णन केले जातंय. ह्या हल्यात किमान 34 लोक जखमी झाले. ल्विव्हचे प्रादेशिक प्रमुख Maksym Kozytskyi यांनी सांगितले की, 30 हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

राष्ट्राध्यक्ष Volodymyr Zelensky यांनी “रशियन दहशतवाद्यांनी” रात्रभर केलेल्या हल्ल्याला “मूर्त” प्रत्युत्तर देण्याचे वचन दिले.

टेलिग्रामवर लिहिताना,Mr Kozytskyi म्हणाले: ” आज रात्री ल्विव्हमधील अपार्टमेंटमध्ये रॉकेटने मारलेली सर्वात लहान मुलगी, फक्त 21 वर्षांची होती. रशिया आमच्या तरुणांना मारत आहे आमचे भविष्याला मारत आहे . मृत्यू होणारी सर्वात वृद्ध व्यक्ती 95 होती. ती महिला दुसऱ्या महायुद्धातून वाचली, पण दुर्दैवाने, ती वर्णद्वेषापासून वाचली नाही.”

ते पुढे असेही म्हणाले” मिसाईलचा वार झालेल्या बिल्डिंग शेजारी एक निवारा होता . ते चांगल्या स्थितीत आहे आणि अलार्मच्या वेळी ते उघडे होते. परंतु, संपूर्ण इमारतीतून फक्त पाच लोक निवारा मध्ये होते. खूप निराशाजनक.”

युक्रेनियन इन्स्टिट्यूट लंडनमध्ये काम करणाऱ्या पण सध्या ल्विव्हमध्ये असलेल्या डॉ. साशा डोव्हझिक( Dr Sasha Dovzhyk) ने एअर रेड सायरन ऐकल्यावर त्यांच्या बाथरूममध्ये लपल्याचे वर्णन केले. त्या म्हणाल्या ” 2 किमी अंतरावरील निवासी इमारतीवर आदळले, तेव्हा मी लपून बसलेल्या बाथरूमच्या भिंती हादरल्या, ह्या वरून कळते किती जोरदार परिणाम झाला होता “

अनेक महिन्यांपासून, रशिया युक्रेनियन शहरांवर प्राणघातक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करत आहे, गेल्या आठवड्यात, युक्रेनच्या रशियन-व्याप्त भागांच्या जवळ असलेल्या क्रामाटोर्स्क या पूर्वेकडील शहरामध्ये एका रेस्टॉरंट आणि शॉपिंग सेंटरला धडक दिल्याने – मुलांसह – 13 लोक ठार झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments