नुकत्याच गोवा येथे पार पडलेल्या इफ्फीमध्ये मराठी चित्रपट गोदावरी ठरला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी मराठी चित्रपट अभिनेते जितेंद्र जोशी यांना सर्वोत्तम कलाकार (पुरूष) म्हणून रजत मयूर पुरस्कार घोषित झाला. जितेंद्र जोशी यांना ‘गोदावरी’ चित्रपटामध्ये दिवंगत मराठी कलाकार आणि चित्रपट निर्माते निशिकांत कामत यांच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार जाहीर झाला . त्याबरोबरच निखील महाजन यांचा मराठी चित्रपट ‘गोदावरी’ आणि दिग्दर्शक रॉड्रीगो दे ऑलिव्हिएरा यांच्या ‘द फर्स्ट फॉलन’ या चित्रपटात भूमिका साकारणारे ब्राझिलचे अभिनेते रेनाटा कार्व्हालो यांना परीक्षकांचा सुवर्ण मयूर विशेष पुरस्कार विभागून देण्यात आला. जेव्हा हा पुरस्कार एखाद्या चित्रपटाला जाहीर होतो तेव्हा तो त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला देण्यात येतो.
‘गोदावरी हा चित्रपट म्हणजे एका सशक्त नदीचे अविश्वसनीय रूपकात्मक चित्रण आहे”
मराठी अभिनेते जितेंद्र जोशी यांनी निखिल महाजन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गोदावरी’ या चित्रपटामध्ये निशिकांत कामत या पात्राची गुंतागुंतीची भूमिका ज्या कौशल्याने साकारली आहे त्याविषयी आतरराष्ट्रीय परीक्षकांनी असे मत नोंदवले आहे की, त्रस्त झालेल्या निशिकांतचे आणि त्याच्या लालबुंद डोळ्यांचे चित्रण एकाचवेळी अतिशय प्रभावी आणि शोकपूर्ण केले आहे. चित्रपटात हे पात्र एकूणच अतिशय गुंतागुंतीचे असतानाही कलाकाराने चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या रागातून वाहणारे अश्रू परिणामकारक ठरतात, असे कौतुक परीक्षकांनी केले आहे.
जितेंद्र जोशी यांना सूवर्ण मयूर, प्रमाणपत्र आणि १० लाख रुपये रोख यावेळी देण्यात आले.