Tuesday, July 16, 2024
Homeमहाराष्ट्र४१व्या वरिष्ठ व २५ व्या खुल्या राष्ट्रीय रोईंग स्पर्धेत महिला गटात मध्यप्रदेश...

४१व्या वरिष्ठ व २५ व्या खुल्या राष्ट्रीय रोईंग स्पर्धेत महिला गटात मध्यप्रदेश तर पुरूष गटात सर्व्हिसेस स्पोर्टस कंट्रोल बोर्ड संघाला विजेतेपद

४१ व्या वरिष्ठ व २५ व्या खुल्या राष्ट्रीय रोईंग स्पर्धेत पुरुष गटात सर्व्हिसेस स्पोर्टस कंट्रोल बोर्ड संघाने, तर महिला गटात मध्यप्रदेश संघाने अव्वल स्थान पटकावले. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग(सी एम ई) कॅम्पस येथे पार पडलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात सर्व्हिसेस स्पोर्टस कंट्रोल बोर्ड संघाने ४ सुवर्णपदक व ३ रजत पदकासह अव्वल स्थान पटकावले. तर, आर्मी संघाने ३ सुवर्ण व ३ रजत पटकावले. एट कार्ड शर्यतीत चंदीगड संघाने विजेतेपद संपादन केले.

महिला गटात मध्यप्रदेश संघाने ४ सुवर्ण व १ रजत पदकासह अव्वल क्रमांक पटकावला. केरळ (२ सुवर्ण), मणिपूर (१ सुवर्ण, १ रजत) या संघांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले.

पुरूष गटात सर्व्हिसेस व आर्मी या दोन्ही संघातील अंतिम लढत चुरशीची झाली. डबल स्कल्स प्रकारात सर्व्हिसेसच्या कुलविंदर सिंग व करमजीत सिंग या जोडीने ०६.४८.९ सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. तर, आर्मीच्या गुरताप सिंग व रवी यांनी ०६.५५.२ सेकंद वेळ नोंदवत दुसरा क्रमांक पटकावला. मात्र, कॉक्सलेक्स प्रकारात आर्मीच्या बाबुलाल यादव व लेखराम यांनी ०७.०६.० वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. तर, सर्व्हिसेसच्या सनी कुमार व इकबाल सिंग (०७.०९.२) यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

पुढच्या दोन्ही शर्यतीत सर्व्हिसेस संघाने वर्चस्व राखले. कॉक्सलेक्स फोर प्रकारात सर्व्हिसेसच्या जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनीत कुमार, आशिष यांनी ०६.२७.३ वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. तर, आर्मीच्या लखवीर सिंग, हरिंदर सिंग, घुरडे पाटील, जस्मील सिंग(०६.२९.५) यांनी दुसरा क्रमांक पटकावला.

सर्व्हिसेस संघाने आपली आघाडी कायम ठेवत ३ पदकांची कमाई केली. लाईट वेट डबल स्कल्स प्रकारात सर्व्हिसेसच्या नितीन देओल व उज्वल कुमार सिंग( (०६:४८.७) यांनी विजेतेपद पटकावले. तर, आर्मीच्या अरविंदर सिंग व रोहीत(०६.५१.२)यांनी रजत पदक पटकावले.

क्वाड्रापल स्कल्स प्रकारात आर्मी संघाने विजेतेपद पटकावले. आर्मीच्या रवी, जसपिंदर सिंग, गुरपरताप सिंग, मनजीत कुमार (०६.१९.३) यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सर्व्हिसेसच्या आशिष फुगट, जाकर खान, करमजित सिंग व कुलविंदर सिंग(०६:२१.२) यांनी दुसरा क्रमांक पटकावला.

सर्व्हिसेस संघाने आणखी एका विजेतेपदाचा मान पटकावत वर्चस्व गाजवले. कॉक्स एट प्रकारात सर्व्हिसेसने (०६.०२.६) पहिला, तर, आर्मी(०६.०४.९)संघाने दुसऱ्या क्रमांक पटकावला.

२००० मीटर शर्यतीत आर्मीच्या बलराज पनवर (०७.१८.७)वेळ नोंदवत संघाला तिसऱ्या पदकाची कमाई करून दिली. तर, सर्व्हिसेसच्या सलमान खानने(०७.२२.५) रजत पदक मिळवून दिले.

महिला गटात मध्यप्रदेश संघाने अव्वल स्थान मिळवले. सिंगल स्कल्समध्ये मध्यप्रदेशच्या खुशप्रीत कौर(०८:४२.४)ने प्रथम, तर महाराष्ट्राच्या मृण्मयी सालगावकर (०८: ४८.७)हीने दुसरे स्थान पटकावले. याशिवाय मध्यप्रदेश संघाने क्वाड्रापल स्कल्स, कॉक्सलेक्स पेअर्स, डबल स्कल्स या प्रकारात देखील विजेतेपद पटकावले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments