Tuesday, February 27, 2024
Homeताजी बातमीपुण्यात भाजपाकडून सोमय्यांचा सत्कार तर काँग्रेसकडून सत्कारानंतर पायऱ्यांवर गोमूत्र टाकून शुद्धीकरण…

पुण्यात भाजपाकडून सोमय्यांचा सत्कार तर काँग्रेसकडून सत्कारानंतर पायऱ्यांवर गोमूत्र टाकून शुद्धीकरण…

पुणे महानगरपालिकेच्या ज्या पायरीवर त्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली, तिथेच भाजपाच्या वतीने सोमय्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे सभागृह नेते गणेश बिडकर आणि नगरसेवक उपस्थित होते. यावेळी पालिकेबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.भाजपकडून यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी पालिकेबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.किरीट सोमय्या यांनी यावेळी भाषणही केलं. ते म्हणाले, “पुण्यातील कोविड सेंटरचा ठेका मिळालेल्या कंपनीचा मालक चहावाला आहे. तसेच हा चहावाला केईएम रुग्णालयामागे असतो. ठाकरे सरकारने पुण्याच्या लोकांच्या जीवाशी खेळ केला. संजय राऊत यांची ही बेनामी कंपनी आहे. पुणे महापालिकेने त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेत ४ ठेके दिले.”

दरम्यान याच पायऱ्यांवर काँग्रेस नेत्यानी पायऱ्यावर गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून भाजपच्या स्टंबाजीचा निषेध केला आहे. किरीट सोमय्या यांच्या येण्यामुळे याठिकाणी मोठा राडा झाला. पुणेकरांच्या प्रश्नासाठी किरीट सोमय्या कधी आले नाहीत, मात्र आता फक्त कंगावा करायला सोय्या इथे येत आहेत. त्यामुळे त्यांचा निषेध आहे. अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांच्याविरोधात काँग्रेसकडून देण्यात आलीय. तसेच आम आदमी पार्टीनेही पुण्यात महापालिकेसमोर आंदोलन केलं आहे. किरीट सोमय्या येणार होते म्हणून कुणालाही प्रवेश दिला नाही, गिरीश बापट दिडशे लोकं आत घेऊन घुसतात, हे निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया आम आदमी पार्टीकडून देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments