Saturday, March 2, 2024
Homeअर्थविश्वपोस्टात नोकरीच्या आमिषाने पुण्यात ८५ युवकांना गंडा, १९ लाखांची फसवणूक, आरोपी फरार

पोस्टात नोकरीच्या आमिषाने पुण्यात ८५ युवकांना गंडा, १९ लाखांची फसवणूक, आरोपी फरार

पुण्यातील भोर तालुक्यात ८५ युवकांना पोस्ट खात्यात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या युवकांची तब्बल १९ लाख ७० हजार रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपींच्या विरोधात भोर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखलं करण्यात आला आहे.ज्ञानेश्वर वरे असं आरोपीचं नाव आहे. त्याच्या विरोधात निलेश तावरे या युवकाने तक्रार दिली होती. त्यानंतर भोर पोलिसांनी ज्ञानेश्वर वरे विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी ज्ञानेश्वर मागील दोन महिन्यांपासून फरार आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीने आणखी काही जणांना फसवलं असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय आहे प्रकरण.. ?
पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यात ८५ युवकांना पोस्ट खात्यात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १९ लाख ७० हजारांची फसवणूक करणाऱ्या आरोपी विरोधात भोर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नोकरी लागल्याचं सांगून विश्वास मिळवला…
आरोपी ज्ञानेश्वर वरे याच्या विरोधात निलेश तावरे या युवकाने तक्रार दिली होती. त्यानंतर भोर पोलीसांनी ज्ञानेश्वर वरे विरोधात गुन्हा दाखल केला. पहिल्यांदा निलेश तावरे याला नोकरीचं आमिष दाखवून त्याच्याकडून २ लाख रुपये घेण्यात आले. त्यानंतर तुला नोकरी लागली, असं खोटं सांगून त्याचा विश्वास संपदान केला.

पीडिताच्या मित्रांचीही फसवणूक…..
त्यानंतर आरोपीने पीडित युवकाच्या इतर मित्रांनाही नोकरीला लावतो, असं सांगून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे. मात्र सत्य समोर येताच युवकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. आरोपी ज्ञानेश्वर मागील दोन महिन्यांपासून फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान आरोपीने आणखी काही जणांना फसवलं असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments