Saturday, March 22, 2025
Homeआरोग्यविषयकपिंपरी चिंचवड शहरात आज २३९६ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर कोरोनामुळे २१...

पिंपरी चिंचवड शहरात आज २३९६ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर कोरोनामुळे २१ जणांचा मृत्यू

८ एप्रिल २०२१,
पिंपरी चिंचवड शहरात आज दि ८ एप्रिल २०२१ रोजी २३९६ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील २३५१तर शहराबाहेरील ४५ जणांचा समावेश आहे. आज मागील २४ तासात कोरोनामुळे २१ जणांचा मृत्यू झाला.

पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १६१११९ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १३३८३९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २१२२ जणांचा मृत्यू झालेला आहे.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०६ पुरुष – मोशी (५८ वर्ष), दिघी (४० वर्ष) , काळेवाडी (६९ वर्ष), चिंचवड (७६ वर्ष), पिंपळे सौदागर (६८ वर्ष), देहुरोड (३२वर्ष), ०९ स्त्री – पिंपळे सौदागर (६९ वर्ष), पिंपळे गुरव (६० वर्ष), थेरगाव ८४ वर्ष), पिंपरी (७४ वर्ष), मोशी (४५ वर्ष), चिंचवड (७४,७५ वर्ष), प्रेम लोकपार्क (९६ वर्ष),भोसरी (७२ वर्ष), येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ४ पुरुष- वडगाव शेरी (४८ वर्षे), कोरेगाव पार्क (८७ वर्ष), औंध ( ६२ वर्ष), खेड (४५ वर्ष) ०२ स्त्री – कुसगाव (७१ वर्षे), रविवार पेठ (७५ वर्ष), येथील रहिवासी आहे.

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १० मृत्यु झालेले आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी रुग्णालय झोन निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या

अ.क्ररुग्णालय झोनकोविड- १९ बाधित रुग्ण संख्याअ.क्ररुग्णालय झोनकोविड- १९ बाधित रुग्ण संख्या
आकुर्डी२४४तालेरा३८७
भोसरी४०८थेरगाव२८०
जिजामाता३८४यमुनानगर२३३
सांगवी३४०वायसीएम७५
  प्रभाग निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या
अ.क्रप्रभागकोविड- १९ बाधित रुग्ण संख्याअ.क्रप्रभागकोविड- १९ बाधित रुग्ण संख्या
२६२२५२
३६७२६०
२४०२४४
५२२२०४

वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments