५ एप्रिल २०२१,
पिंपरी चिंचवड शहरात आज दि ५ एप्रिल २०२१ रोजी २१९६ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील २१५२ तर शहराबाहेरील ४४ जणांचा समावेश आहे. आज मागील २४ तासात कोरोनामुळे १६ जणांचा मृत्यू झाला.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १५३०८० वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १२८४५० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २०७९ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०९ पुरुष चिंचवड (७०,३९ वर्षे), चिखली (६२ वर्षे), आकुर्डी (७३,६९ ५३ वर्षे), काळेवाडी (५९ वर्षे), भोसरी (५२ वर्षे), पिंपळेगुरव (६६ वर्षे) ०५ स्त्री – चिखली (६५,४८ वर्षे), बिजलीनगर (७६ वर्षे), पिंपरी (५२ वर्षे), पिंपळे गुरव (५६ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – खेड (८० वर्षे) ०१ स्त्री – येरवडा (५३ वर्षे), येथील रहिवासी आहे.
टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ७ मृत्यु झालेले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी रुग्णालय झोन निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या
अ.क्र | रुग्णालय झोन | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या | अ.क्र | रुग्णालय झोन | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या |
१ | आकुर्डी | २१८ | ५ | तालेरा | ३६५ |
२ | भोसरी | ५१२ | ६ | थेरगाव | १८८ |
३ | जिजामाता | ३५२ | ७ | यमुनानगर | २२८ |
४ | सांगवी | २२० | ८ | वायसीएम | ६९ |
प्रभाग निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या | |||||
अ.क्र | प्रभाग | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या | अ.क्र | प्रभाग | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या |
१ | अ | ३८६ | ५ | इ | २११ |
२ | ब | ३५६ | ६ | फ | २३१ |
३ | क | २८४ | ७ | ग | २४१ |
४ | ड | ३१४ | ८ | ह | १२९ |
वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.