६ एप्रिल २०२१,
पिंपरी चिंचवड शहरात आज दि ६ एप्रिल २०२१ रोजी २९३८ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील २९०४तर शहराबाहेरील ३४ जणांचा समावेश आहे. आज मागील २४ तासात कोरोनामुळे १७ जणांचा मृत्यू झाला.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १५५९८४ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १३०१२९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २०९४ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे १० पुरुष – चिंचवड ( ४७ ,७१ वर्षे), थेरगांव (६५ ,६७ वर्षे), कासारवाडी (५० वर्षे), पिंपळे निलख (६८ वर्षे), दापोडी (६१ वर्षे), खराळवाडी (४५ वर्षे), शाहूनगर (८१ वर्षे), कस्पटेवस्ती (६५ वर्षे) ०५ स्त्री – चिंचवड ( ४०वर्षे), भोसरी (७३वर्षे), निगडी (६२ वर्षे), काळेवाडी (५४ वर्षे), सांगवी (७० वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ स्त्री – घोरपडी (५६ वर्षे) धायरी (५३ वर्षे) येथील रहिवासी आहे.
टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ९ मृत्यु झालेले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी रुग्णालय झोन निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या
अ.क्र | रुग्णालय झोन | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या | अ.क्र | रुग्णालय झोन | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या |
१ | आकुर्डी | ३०५ | ५ | तालेरा | ४५० |
२ | भोसरी | ३९२ | ६ | थेरगाव | ३५० |
३ | जिजामाता | ५७१ | ७ | यमुनानगर | ४२६ |
४ | सांगवी | ३२० | ८ | वायसीएम | ९० |
प्रभाग निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या | |||||
अ.क्र | प्रभाग | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या | अ.क्र | प्रभाग | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या |
१ | अ | ४१६ | ५ | इ | २४० |
२ | ब | ४८७ | ६ | फ | ३९९ |
३ | क | २५९ | ७ | ग | ३८९ |
४ | ड | ५२३ | ८ | ह | १९१ |
वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.