Friday, September 20, 2024
Homeआरोग्यविषयकपिंपरी चिंचवड शहरात आज ९२ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर ०४ जणांचा...

पिंपरी चिंचवड शहरात आज ९२ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर ०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

५ फेब्रुवारी २०२१,
पिंपरी चिंचवड शहरात आज दि ५ फेब्रुवारी २०२१ रोजी ९२ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील ८५ तर शहराबाहेरील ७ जणांचा समावेश आहे .आज मागील २४ तासात कोरोनामुळे ४ जणांचा मृत्यू झाला.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – वाकड (८० वर्षे), चिंचवड (३३), ०१ स्त्री – चिखली (४९) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – अहमदनगर (६४ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments