२२ सप्टेंबर २०२०
पिंपरी चिंचवड शहरात आज दि.२२सप्टेंबर रोजी ८३२ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. आज शहराच्या हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा ३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ७१६४१ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६१९९५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ११७५ जणांचा मृत्यू झालेला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे चिंचवड (पुरुष ७६ वर्षे, पुरुष ७५ वर्षे, पुरुष ३४ वर्षे) भोसरी (पुरुष ७१ वर्षे,पुरुष ३६ वर्षे, पुरुष ६८ वर्षे, पुरुष ५८ वर्षे) पिंपरी (पुरुष ८४ वर्षे, स्त्री ५८ वर्षे, पुरुष ५९ वर्षे), तळवडे (पुरुष ५० वर्षे) सांगवी (पुरुष ६३ वर्षे, पुरुष ३५ वर्षे) ताथवडे (स्त्री ६५ वर्षे) पिंपळेनिलख (पुरुष ७५ वर्षे) वाकड (स्त्री ४६ वर्षे) आकुर्डी (पुरुष ५५ वर्षे) मोशी (स्त्री ४० वर्षे), निगडी (पुरुष ७० वर्षे) प्राधिकारण (पुरुष ६३ वर्षे), चिखली (पुरुष ५९ वर्षे), रुपीनगर (पुरुष ४९ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे चाकण (पुरुष २९ वर्षे, स्त्री ४७ वर्षे), धनकवडी (स्त्री ५८ वर्षे), वरजे (स्त्री ५३ वर्षे), मंचर (पुरुष ७३ वर्षे), लोणावळा ( पुरुष ७९ वर्षे), वडगाव ( पुरुष ७५ वर्षे) मारुंजी ( पुरुष ३४ वर्षे) इंदूरी ( पुरुष वर्षे), जुन्नर (पुरुष वर्षे), आंबेगाव ( पुरुष ७० वर्षे), सातारा (स्त्री ७२ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
*आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील कळविलेल्या २२ मृत रुग्णांपैकी आज ०२ आणि यापुर्वी परंतु आज अहवाल प्राप्त झालेले मृत २० आहेत.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra ) मास्क जवळ बाळगावा.