Monday, May 12, 2025
Homeआरोग्यविषयकपिंपरी चिंचवड शहरात आज ८३ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर ०४ जणांचा...

पिंपरी चिंचवड शहरात आज ८३ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर ०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

१९ जानेवारी २०२१,
पिंपरी चिंचवड शहरात आज दि १९ जानेवारी २०२१ रोजी ८३ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील ८१ तर शहराबाहेरील २ जणांचा समावेश आहे. आज मागील २४ तासात कोरोनामुळे ४ जणांचा मृत्यू झाला.

पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९९०२९ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९५७७१वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७८९जणांचा मृत्यू झालेला आहे.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०२ स्त्री – चिंचवड (७५वर्षे ), पिंपरी (६०वर्षे ) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – कात्रज ( ४८ वर्षे) ०१ स्त्री – जुन्नर (९० वर्षे ) येथील रहिवासी आहेत.

वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments