२ फेब्रुवारी २०२१,
पिंपरी चिंचवड शहरात आज दि २ फेब्रुवारी २०२१ रोजी ६१ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील ६१ तर शहराबाहेरील शून्य जणांचा समावेश आहे .आज मागील २४ तासात कोरोनामुळे १ जणांचा मृत्यू झाला.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०००४५२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९६६५३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८१० जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०१ स्त्री – पिंपरी (६७ वर्षे ) येथील रहिवासी आहेत.
वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.