१४ आॅक्टोबर २०२०
पिंपरी चिंचवड शहरात आज दि.१४आॅक्टोबर रोजी ३१३जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील २८९तर शहराबाहेरील २४ रुग्णांचा समावेश आहे. आज शहराच्या हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा १०जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८४५६४ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७९७४६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १४५५ जणांचा मृत्यू झालेला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष – भोसरी (५४ वर्षे) देहूरोड (६६ वर्षे) पिंपळेगुरव (७२ वर्षे) दिघी (७२ वर्षे) ०४ स्त्री – चिखली (५३ वर्षे) चिंचवड (६८ वर्षे) निगडी (६५ वर्षे) सांगवी (७० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – तळेगांव (३० वर्षे) राजगुरुनगर (५५ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.