२७ नोव्हेंबर २०२०,
पिंपरी चिंचवड शहरात आज दि.२७ नोव्हेंबर रोजी २३५ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील २३५ आहे. तर आज कोरोनामुळे ४ जणांचा मृत्यू झाला.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९१७५० वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८७८६० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १६१८ जणांचा मृत्यू झालेला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष – काळेवाडी (४७ वर्षे), वडमुखवाडी (६८ वर्षे), भोसरी (६२ वर्षे), ०१ स्त्री चिंचवड (७५ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.