Sunday, June 15, 2025
Homeआरोग्यविषयकपिंपरी चिंचवड शहरात आज २२७७ जणांना कोरोनाची लागण…तर आज ओमायक्रॉनचे दोन रुग्ण...

पिंपरी चिंचवड शहरात आज २२७७ जणांना कोरोनाची लागण…तर आज ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले

पिंपरी चिंचवड शहरात आज दि १२ जानेवारी २०२२ रोजी २२७७ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर कोरोनामुळे १ जणांचा मृत्यू झाला यामध्ये 0 पिंपरी चिंचवड मनपा हद्दीमधील १ मनपा हद्दीबाहेरील आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २९२२६१ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २७७५१७ वर पोहोचली आहे.आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५२८ जणांचा मृत्यू झालेला आहे.

आज ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले असून उपचार चालू आहे . तसेच उद्या शुक्रवार दिनांक १४ जानेवारी रोजी शहरातील लसीकरण केंद्र नियमित प्रमाणे चालू राहतील.

आजपर्यंत शहरातील एकूण लसीकरण ३१३०१३७ एवढे झाले आहे.

वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्वांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.

टिप – उपरोक्त माहिती वॉर रुममधील डॅशबोर्डवरील माहिती नुसार तयार करण्यात आली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments