Monday, July 14, 2025
Homeताजी बातमीपिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसकडून लढण्यास २२ जण विधानसभेसाठी इच्छुक

पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसकडून लढण्यास २२ जण विधानसभेसाठी इच्छुक

शहरात कमी ताकद असलेल्या काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी २२ जण इच्छुक आहेत. पिंपरी मतदारसंघातून दहा, चिंचवडमध्ये नऊ आणि भोसरीतून तिघांनी मुलाखती दिल्या आहेत. माजी मंत्री, आमदार यशोमती ठाकूर यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.अनुसूचित जातींसाठी (एससी) राखीव असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून विश्वनाथ जगताप , मनोज कांबळे, बाबासाहेब बनसोडे ,गौतम आरकडे, शामला सोनवणे, ज्योती गायकवाड, डॉ. मनीषा गरुड ,चंद्रकांत लोंढे, पंकज बगाडे, अर्चना राऊत हे इच्छुक आहेत.

चिंचवडमध्ये शहराध्यक्ष कैलास कदम, सज्जी वर्की, संदेश नवले ,तुकाराम भोंडवे, प्रियंका मलशेट्टी-कदम, सायली नढे, शशी नायर, राजन नायर, भरत वाल्हेकर, तर भोसरी मतदारसंघातून सोमनाथ शेळके, विठ्ठल शिंदे, स्मिता पवार यांनी मुलाखती दिल्या. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने शहरातील तिन्ही मतदारसंघांवर दावा केला आहे. तर, शिवसेना (ठाकरे) पक्षाने भोसरी आणि पिंपरीवर दावा सांगितला आहे. त्यातच आता काँग्रेसने तिन्ही मतदारसंघांसाठी मुलाखती घेतल्याने महाविकास आघाडीत पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये शहर काँग्रेसचे काम तळागाळात आहे. शहरात पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. बूथ स्तरावर पक्षाची बांधणी झाली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो मतदारसंघ आणि उमेदवार देतील, त्या उमेदवारास एकदिलाने काम करून निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्ते दिवस-रात्र काम करतील, असे वरिष्ठ उपाध्यक्ष मयूर जयस्वाल यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments