पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी दि. ०२ डिसेंबर रोजी रोजी ४६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २७७५९० वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २७३४७५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५११ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०१ एवढी आहे.
दरम्यान ‘ओमिक्रॉन’ या करोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने परदेशामधून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. नायजेरिया या देशामधून दि. २५ नोव्हेंबर रोजी आलेल्या आणखी ०१ नागरिकाचा आज रोजी कोविड – १९ अहवाल पॉझिटीव्ह आलेला आहे व संपर्कात आलेल्या आणखी ०२ व्यक्तींचा आज कोविड १९ अहवाल पॉझिटीव्ह आलेला आहेत. तसेच या नागरिकांचे नवीन ‘ ओमिक्रॉन ‘ या करीताच्या व्हेरिएंटच्या तपासणी कामी घशातील द्रवाचे नमुने जिनोम सिकव्हेंमिंग ( Genome sequencing ) करिता एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात आलेले आहेत.
आजपर्यंत नायजेरियामधून आलेल्या ३ संपर्कातील ३ अशा ०६ रुग्णांचे कोविड १९ अहवाल पॉझिटीव्ह आलेले असून त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे व संपर्कामधील नागरिकांना गृहविलगीकरणामध्ये ठेवण्यात आलेले आहे. या सर्वांची प्रकृती स्थीर आहे.