२४ आॅक्टोबर २०२०
पिंपरी चिंचवड शहरात आज दि.२४आॅक्टोबर रोजी १८३ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील १७२तर शहराबाहेरील ११ रुग्णांचा समावेश आहे. आज शहराच्या हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा ०८जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८६६३६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८२८९९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १५०८ जणांचा मृत्यू झालेला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष – चिखली (७९ वर्षे), चिंचवड (३७ वर्षे), पिंपरी (४८ वर्षे), मोशी (५८ वर्षे) ०२ स्त्री ताथवडे (६८ वर्षे), भोसरी (७१ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – खोदड पुणे (७३ वर्षे), चर्तुशृंगी (५२ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिम (दुसरा टप्पा) अंतर्गत आज अखेर १३१४ पथकांव्दारे २०१८८८७ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये ४९११ व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता १६४ व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगाव.