Monday, May 12, 2025
Homeताजी बातमीपिंपरी चिंचवड शहरात आज १२८ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर ३ जणांचा...

पिंपरी चिंचवड शहरात आज १२८ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

४ फेब्रुवारी २०२१,
पिंपरी चिंचवड शहरात आज दि ४ फेब्रुवारी २०२१ रोजी १२८ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील ११३ तर शहराबाहेरील १५ जणांचा समावेश आहे .आज मागील २४ तासात कोरोनामुळे३ जणांचा मृत्यू झाला.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – चऱ्होली (५५ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ स्त्री – मरकळ (७२ वर्षे) खालापुर (६९ वर्ष) येथील रहिवासी आहेत.

वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments