२ नोव्हेंबर २०२०
पिंपरी चिंचवड शहरात आज दि.२ नोव्हेंबर रोजी १२१ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील १४३ तर शहराबाहेरील ०३ रुग्णांचा समावेश आहे. आज शहराच्या हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा ०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८७९९६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८४७१०वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १५२९ जणांचा मृत्यू झालेला आहे.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – वल्लभनगर (७५ वर्षे) येथील रहिवासी आहेत.पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण ०१ पुरुष – खेड (६८ वर्षे), स्त्री ०१ खेड ( ६५ वर्षे ) येथील रहिवासी आहेत.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.