१ जानेवारी २०२१
पिंपरी चिंचवड शहरात आज दि १ जानेवारी २०२१ रोजी १२० जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील १२० तर शहराबाहेरील शुन्य जणांचा समावेश आहे .आज मागील २४ तासात कोरोनामुळे १ जणांचा मृत्यू झाला.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९६७२८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९३४७५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७५७ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – चिंचवड (५८ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील २६८ प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी १४ प्रवाशी भारतात परतलेले नाहीत, ५० प्रवाशी बाहेरगावी गेलेले आहेत व १६ प्रवाशांचा २८ दिवसांचा कालावधी पुर्ण झालेला आहे. उर्वरीत १८८ प्रवाशांची चाचणी केली असून त्यापैकी १७३ नकारात्मक असून ७ अहवाल कोविड सकारात्मक आहे उर्वरित ८ अहवाल प्रलंबित आहेत.
वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.