४ डिसेंबर २०२०,
हैदराबादमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरूच आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी भाजपने पहिल्या टप्प्यात मुसंडी मारली होती खरी पण पुन्हा एकदा TRSची गाडी सुसाट पळाल्याचं पाहायला मिळालं. 12.30 पर्यंत हाती आलेल्या कलनुसार भाजप पिछाडीवर गेलं असून TRSनं पुन्हा आघाडी घेतली आहे. भाजप नेत्यांच्या मनातली धाकधूक वाढली असून अंतिम निकालाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. आतापर्यंत एमआयएम आणि TRS यांचा प्रत्येक एका जागेवर विजय झाला आहे.
शुक्रावारी 12.30 वाजेपर्यंत दुसरा कल हाती आला आहे.
BJP 21 जागांवर आघाडी
TRS- 60 जागांवर आघाडी
AIMIM 21 जागांवर आघाडी
INC 02 जागांवर आघाडी