Saturday, March 2, 2024
Homeअर्थविश्वबनावट बँक गॅरंटी देऊन पालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी ; पिंपरी पोलिस स्टेशन...

बनावट बँक गॅरंटी देऊन पालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी ; पिंपरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत अ व ब क्षेत्रीय कार्यालय कार्यक्षेत्रातील रस्ते, गटर्स यांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी निविदा प्रसिध्द करणेत आली होती.में सिक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा.लि. पुणे यांनी या प्रकरणी महानगरपालिकेची खोटी कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याने त्याचे विरोधात पिंपरी पोलिस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दरम्यान प्राप्त लघुत्मत दर निविदा धारक मे सिक्युअर आयटी फैसिलिटी मॅनेजमेंट प्रा.लि. पुणे यांनी निविदा अटी शर्तीनुसार महानगरपालिकेस परफॉरमन्स सिक्यूरिटी डिपॉझिट रकमेपोटी सादर करावयाच्या एकुण रक्कम रुपये ६, ९०, ७१,००० / – एवढ्या रकमेच्या स्टेट बैंक ऑफ इंडिया एमजी रोड फोर्ट मुंबई या शाखेच्या बँक गॅरंटी महापालिकेस सादर केलेल्या होत्या. तथापी बँक गॅरंटी या बनावट असलेबाबत तक्रार अर्ज प्रातः झालेनंतर महानगरपालिकेमार्फत प्रत्यक्ष शहानिशा केली असता सादर केलेल्या बँक गॅरंटी या बनावट असलेचे निष्पन्न झालेले आहे. त्यानुसार मे सिक्युअर आयटी फैसिलिटी मॅनेजमेंट प्रा.लि.यांच्याविरोधात पिंपरी पोलिस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments