Friday, September 29, 2023
Homeअर्थविश्व१ नोव्हेंबरपासून बदलणार महत्त्वाचे नियम.. बँक, सिलिंडर, रेल्वे मध्ये होणार बदल

१ नोव्हेंबरपासून बदलणार महत्त्वाचे नियम.. बँक, सिलिंडर, रेल्वे मध्ये होणार बदल

२९ ऑक्टोबर २०२०,
देशात १ नोव्हेंबरपासू काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. त्याचा थेट परिणाम सामान्यांवरही होणार आहे. १ नोव्हेंबरपासून सिलिंडर बूकिंग, बँक चार्जपासून काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. तर दुसरीकडे रेल्वेद्वारेही वेळापत्रकात काही बदल करण्यात येणार आहेत.

१ नोव्हेंबरपासू एलपीजी सिलिंडर तुमच्यापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया बदलणार आहे. सिलिंडर बूक केल्यानंतर ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवण्यात येणार आहे. जेव्हा सिलिंडर घरी येईल तेव्हा सिलिंडर पोहोचवणाऱ्यांना तो ओटीपी द्यावा लागेल. सिस्टममध्ये त्या ओटीपीची पडताळणी केल्यानंतर ग्राहकांना सिलिंडर देण्यात येईल. नव्या प्रक्रियेमुळे ग्राहकांना जसा फायदा होणरा तशाच त्यांना समस्यांचा सामनाही करावा लागणार आहे. जर ग्राहकांना पत्ता आणि मोबाईल क्रमांक चुकीचा असला तर त्यांना सिलिंडर मिळणार नाही. नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक अपडेट करण्य़ाचं आवाहन कंपन्यांकडून करण्यात आलं आहे. कमर्शिअल एलपीजी सिलिंडरसाठी हा नियम लागू असणार नाही.

Indane गॅलनं बदलला बुकींग क्रमांक

जर तुम्ही इंडेनचे ग्राहक असाल तर तुम्हाला जुन्या क्रमांकावर गॅस बूक करता येणार नाही. कंपनीनं गॅसच्या बुकींगसाठी आपल्या ग्राहकांना एक नवा क्रमांक पाठवसा आहे. इंडेनच्या ग्राहकांसाठी आता देशभरात 7718955555 हा एकच क्रमांक असणार आहे.

पैसे काढण्यासाठी शुल्क

बँकांमध्ये आता पैसे काढण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी शुल्कही द्यावं लागणार आहे. बँक ऑफ बडोदानं याची सुरूवातही केली आहे. ठराविक मर्यादेपेक्षा अधिक रक्कम काढल्यास यापुढे ग्राहकांना शुल्क द्यावं लागणार आहे. लोन खात्यासाठी जे ग्राहक तीन वेळापेक्षा अधिक वेळा रक्कम काढतील त्यांना १५० रूपये शुल्क द्यावं लागणार आहे. तर बचत खात्यांमध्ये ग्राहकांना केवळ तीन वेळा पैसे जमा करता येतील. परंतु चौथ्यांदा पैसे जमा करायचे असल्यास ग्राहकांना ४० रूपये मोजावे लागतील.

रेल्वेचं वेळापत्रक बदलणार

१ नोव्हेंबरपासून रेल्वेचं वेळापत्रक बदलणार आहे. यापूर्वी १ ऑक्टोबरपासून वेळापत्रकात बदल होणार होता. परंतु काही कारणास्तव बदल १ नोव्हेंबरपासून केला जाणार आहे. देशात धावणाऱ्या १३ हजार प्रवासी रेल्वे आणि ७ हजार मालगाड्यांचं वेळापत्रक बदलण्यात येणार आहे. देशात धावणाऱ्या राजधानी गाड्यांच्याही वेळेत बदल होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments