Sunday, August 16, 2026
Homeअर्थविश्वHDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या काही सेवा शनिवार ते रविवार 18 तास...

HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या काही सेवा शनिवार ते रविवार 18 तास बंद राहतील

२१ ऑगस्ट २०२१
देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना आठवड्याच्या शेवटी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बँकेच्या काही सेवा शनिवार ते रविवार 18 तास बंद राहतील, अशी माहिती बँकेनं दिलीय. बँकेने ही माहिती आपल्या ग्राहकांना ई-मेलद्वारे पाठवली आहे. डिजिटल बँकिंग सुविधा आणखी सुधारण्यासाठी बँक मेंटेनन्सचे काम करेल.

जाणून घ्या कोणत्या वेळी या सेवा बंद होतील?
एचडीएफसी बँकेने कळवले आहे की, या सेवा 21 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9 ते 22 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 3 पर्यंत प्रभावित होतील. ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल खेद असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. त्याच वेळी त्याला अपेक्षा आहे की, ग्राहक या कामात त्याला सहकार्य करतील.

या सेवा कार्य करणार नाहीत
दरम्यान, नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंगवरील कर्ज सेवा प्रभावित होणार आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर तुम्हाला सोमवारपर्यंत थांबावे लागेल.

बँकेने काय सांगितले ते जाणून घ्या?
प्रिय ग्राहक, एचडीएफसी बँकेबरोबर बँकिंग केल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आशा आहे की तुम्ही आणि तुमचे प्रियजन सुरक्षित असाल. आपल्याला सर्वोत्तम डिजिटल बँकिंग अनुभव देण्यासाठी आमच्या सतत प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही नियोजित देखभाल करत आहोत. या उपक्रमादरम्यान कर्जाशी संबंधित सेवा प्रभावित होतील. या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments