राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पिंपरी-चिंचवड शहराच्या महत्त्वाच्या प्रश्नांना केवळ आवाजच मिळाला नाही, तर ठोस मंजुरी आणि निधीचे आश्वासनही मिळाले आहे. आमदार अमित गोरखे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देत अधिवेशनातील कामगिरीचा सविस्तर आढावा मांडला.
शहराच्या विस्तारित भागातील रस्ते, उड्डाणपूल आणि पाणीपुरवठा योजनांसाठी राज्य शासनाकडून विशेष निधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पांची प्रशासकीय प्रक्रिया गतिमान करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचेही गोरखे यांनी नमूद केले.
पत्रकार परिषदेत बोलताना गोरखे म्हणाले की, “अधिवेशनात पिंपरी-चिंचवडच्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक कौतुक केले. ही शाबासकी म्हणजे शहराच्या विकासासाठी नवी ऊर्जा आहे. येत्या काळात रखडलेले प्रकल्प मार्गी लावून शहराचा समतोल आणि वेगवान विकास साधणार आहोत.”
यावेळी त्यांनी आरक्षण वर्गीकरणाचा मुद्दा तसेच अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणाचा उल्लेख करत, दोन्ही विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
या पत्रकार परिषदेला भाजपा शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, उपमहापौर सौ. शर्मिला बाबर, शहर सुधारणा समिती अध्यक्ष श्री. संजय (नाना) काटे, ज्येष्ठ नेते श्री. सदाशिव खाडे, श्री. राजू दुर्गे, नगरसेवक श्री. तुषार हिंगे, श्री. शितल उर्फ विजय शिंदे, श्री. कुशाग्र कदम, श्री. अमित गावडे, नगरसेविका श्रीमती अनुराधा गोरखे, सौ. सुप्रिया चांदगुडे, सौ. मधुरा शिंदे, दक्षिण भारतीय आघाडी प्रमुख श्री. राजेश पिल्ले, भाजपा मंडल अध्यक्ष श्री. धरम वाघमारे, भाजपा मंडल अध्यक्षा सौ. अनिता वाळूजकर, भाजपा चिटणीस श्री. नरेश पंजाबी, श्री. राजेंद्र बाबर, श्री. युवराज लांडे, श्री. देवदत्त लांडे, श्री. नंदू कदम, श्री. नेताजी शिंदे, श्री. सुनील पलांडे, श्री. सुनील कदम उपस्थित होते.


