पुर्वी भीक मागणारा एक मुलगा … याला माणसांत यायचंय…! चित्रकार म्हणुन सन्मानानं जगायचंय…
याच्या चित्राचं प्रदर्शन मांडलंय आम्ही… !!! हे प्रदर्शन फक्त चित्रांचं नाही… हे प्रदर्शन आहे एका जिद्दीचं.
याला बोटं आणि तळहात नाहीत… म्हणुन, “नशिबाची” कुठलीही “रेषा” याच्या हातावरही नाही.
तरीही, यानं या हातावर नसलेल्या “रेषांनाच”, “नशीब” बनवलंय… कागदावर चितारलंय…!
हे प्रदर्शन आहे… आस्तित्वात नसलेल्या अशा रेषांचं…!!!
दि. 17-18-19-20 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 8 या वेळात पी. एन. गाडगीळ ज्वेलरी शॉप , रिलायन्स मॉल शेजारी, औंध, पुणे. (020-25881555, 25881556) येथे आयोजीत करीत आहोत.
आपण वेळात वेळ काढुन आलात तर आम्ही सर्वचजण ऋणी राहु… !
खुप विक्री व्हावी, हा प्रदर्शनाचा हेतुच नाही !
ज्या समाजाने भिक मागत असताना मला हाकलुन दिलं.. तोच समाज मी भिक मागणं सोडल्यावर माझा सन्मान करतो,
हा मेसेज मला त्याला आणि इतर भिक्षेकरी वर्गाला द्यायचा आहे. !लोक भिक्षेक-याला नाही, कष्टक-याला मान देतात…
हे बीज आम्हाला यांच्या मनात रुजवायचं आहे… !
आपले स्नेहांकित, डॉ.अभिजीत सोनवणे, डॉ.मनिषा सोनवणे ,डॉक्टर फॉर बेगर्स
अधिक माहितीसाठी संपर्क सोहम ट्रस्ट, पुणे
9822267357
abhisoham17@gmail.com
www.sohamtrust.com
II एक अनोखे चित्रकला प्रदर्शन II
RELATED ARTICLES