Sunday, December 3, 2023
Homeताजी बातमी"मला बोलावलं तर मीपण जाऊन भेटून येईन"… छगन भुजबळ यांचे शरद पवारांना...

“मला बोलावलं तर मीपण जाऊन भेटून येईन”… छगन भुजबळ यांचे शरद पवारांना बदल वक्तव्य

छगन भुजबळ म्हणाले आहेत कार्यकर्ते शरद पवारांनी बोलावलं म्हणून भेटायला जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवार यांनीही दावा सांगितला आहे. अशात शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा सामना बघायला मिळतो आहे. अशात छगन भुजबळ यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. शरद पवार यांना आमदार भेटायला जात आहेत तर त्यात चुकीचं काय? दोन-चार आमदार वगळले तर सगळे आमच्याच बाजूने आहेत असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाले छगन भुजबळ?

“दोन-चार आमदार वगळले तर सगळे आमच्याच बरोबर आहेत. कार्यकर्तेही आमच्याच बाजूने आहेत. अजित पवारांना किती प्रतिसाद मिळतो आहे तुम्ही बघू शकता.” असंही भुजबळ म्हणाले. त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की काही आमदार हे सिल्वर ओकवर जात आहेत. त्यावर भुजबळ म्हणाले, “त्यात काय साहेबांनी बोलावलं तर जातात. मला बोलावलं तर मी पण जाऊन भेटून येईन. मला बोलावलं तर मीपण जाऊन भेटून येईन. ” असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे

छगन भुजबळ यांनी परवाही हे म्हटलं होतं की शरद पवार हे आम्हा सगळ्यांचे गुरु आहेत. त्यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. आज जेव्हा त्यांना हे विचारण्यात आलं की अजित पवार यांच्यावर अन्याय झाला आहे का? त्यावर छगन भुजबळ म्हणाले बाकी सगळ्या गोष्टी स्टेजवर बोलू.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली आहे ती अभूतपूर्व आहे. आमच्याकडे ४० पेक्षा जास्त आमदार आहेत असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारीच केला आहे. त्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या बैठका मुंबईत पार पडत आहेत. सकाळपासूनच अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. तर सिल्वर ओक या बंगल्यावरही काही कार्यकर्ते पोहचले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments