Tuesday, November 12, 2024
Homeताजी बातमीआज मुंबईला जाणार असाल तर हे वाचा ; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज...

आज मुंबईला जाणार असाल तर हे वाचा ; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज ट्रॅफिक ब्लॉक, दोन तास वाहतूक बंद….

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ITMS प्रकल्प राबवण्यास सुरुवात होत आहे. यासाठी आज द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक घेतला जात आहे. ITMS प्रकल्पाचा एक भाग म्हणजे ओव्हरहेड ग्रॅंटी. तीच उभारण्यासाठी आज दुपारी 12 ते 2 दरम्यान हा ब्लॉक घेतला जात आहे. किवळे ते सोमटने दरम्यान हे काम सुरू होत आहे. या दोन तासासाठी जुन्या पुणे मुंबई-महामार्गाकडे वाहतूक वळवली जाणार आहे.

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यूनंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ITMS प्रकल्प राबवण्यास सुरुवात होत आहे. यासाठी आज द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक घेतला जात आहे. ITMS प्रकल्पाचा एक भाग म्हणजे ओव्हरहेड ग्रॅंटी. तीच उभारण्यासाठी आज दुपारी 12 ते 2 दरम्यान हा ब्लॉक घेतला जात आहे. किवळे ते सोमटने दरम्यान हे काम सुरू होत आहे. या दोन तासासाठी जुन्या पुणे मुंबई-महामार्गाकडे वाहतूक वळवली जाणार आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे महाराष्ट्रातीलच नाही तर देशातला एक महत्वाचा महामार्ग. रोज या मार्गावरुन हजारो गाड्या प्रवास करतात. राजधानीला जोडणारा हा महत्वाचा मार्ग असल्यानं 24 तास महामार्ग गाड्यांनी फुल्ल असतो. या महामार्गामुळं वाहतूक जितकी सुकर झालीय तितकंच यावर होणाऱ्या अपघातांमुळं मार्ग नेहमी चर्चेत असतो. सतत महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतात. काही दिवसांपूर्वी विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूनंतर या महामार्गाच्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर विरोधकांनी यावरुन गदारोळही केला. त्यानंतर सरकारने तात्काळ पावले उचलत इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सुरु करण्याचा निर्णय घेतला. 340 कोटींचा हा प्रकल्प असेल. यातील 115 कोटी उभारणी साठी तर उर्वरित 225 कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत.

काय आहे आयटीएमएस सिस्टिम

आयटीएमएस म्हणजे इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम. या सिस्टिमद्वारे वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होईल. या प्रणालीमध्ये ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचेल. संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं असेल. हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतील. त्याशिवाय अशा वाहनांना अडवण्याचे निर्देश पोलिसांना मिळतील, ज्यामुळे अशा वाहनांना अडवून संभाव्य अपघात टाळता येतील. 39 ठिकाणी वाहनांचा वेग मोजणारी यंत्रे असणार आहेत.

ITMS – इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम

  • वाहनं टेक्नॉलॉजी शी कनेक्ट असणं गरजेचं आहे.
  • यासाठी व्हेईकल डिटेक्शन सेन्सर गरजेचं असेल, म्हणजेच वाहनात जीपीएस सारखे सेन्सर लावले जातील.
  • ब्लुटूथ आणि वाय-फाय चा यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होईल, जे हल्लीच्या वाहनात इन बिल्ड असतातच.
  • सीसीटीव्ही द्वारे अपघात आणि वाहतूक कोंडीवर नजर ठेवली जाईल.
  • अशावेळी द्रुतगती वरून धावणाऱ्या वाहनांना सेन्सरद्वारे अपघात अथवा वाहतूक कोंडीची माहिती पोहचेल, संभाव्य धोका पाहता ते वाहनावर आधीच नियंत्रण आणू शकतात.
  • अवजड वाहनं द्रुतगती मार्गावर पार्क असतील तर त्याची ही कल्पना सेन्सर मुळं मिळेल
  • अपघातानंतर घटनास्थळ क्षणार्धात लक्षात येईल अन तातडीची मदतही पोहचेल.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments