Wednesday, February 19, 2025
Homeताजी बातमीनैतिकतेने काम केले तर समाजमन विचलीत होणार नाही - भाऊसाहेब भोईर

नैतिकतेने काम केले तर समाजमन विचलीत होणार नाही – भाऊसाहेब भोईर

महाराष्ट्र ही नाट्य क्षेत्राची पंढरी आहे. गोवा, केरळ प्रमाणे शालेय अभ्यासक्रमात नाट्यशास्त्राचा समावेश करावा. ताल, तोल आणि लय याचे भान ठेवून जीवन कसे जगावे, याचे ज्ञान नाट्यशास्त्रातून मिळते आणि व्यक्तिमत्व विकास होतो. राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना नैतिकतेचे आणि वैचारिकतेचे भान ठेवून काम केले तर समाजमन दिशाहीन आणि विचलीत होणार नाही. सुसंस्कृत आणि जबाबदारीचे भान असणारा समाज घडवणे ही फक्त शिक्षकांची जबाबदारी नसून पालकांचीही जबाबदारी आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष आणि मध्यवर्ती नाट्य परिषद मुंबई, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा व मावळ शिक्षण प्रबोधन परिवार यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड आणि मावळ मधील शिक्षकांचा सत्कार समारंभ प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे रविवारी आयोजित करण्यात आला होता.

यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष आणि मध्यवर्ती नाट्य परिषद मुंबई उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कार्यक्रमाचे अध्यक्षआमदार सुनील शेळके, पिंपरी चिंचवड मनपाचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका मृणाल गांजाळे तसेच संध्या गायकवाड, सुधीर भागवत, सुदाम वाळुंज, वी. म. शिंदे शोभाताई वहिले, तानाजी महाळुंगकर आणि ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक संतोष पवार आदींसह शिक्षक उपस्थित होते. यावेळी सोनिया काळोखे, संजय जगताप, सुभाष भानुसघरे, नीता गोगावले संतोष भारती, राजेश डेव्हीड, स्वाती गाडे यांचा स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन तसेच राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका मृणाल गांजाळे यांचा ही विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर प्रेक्षकांसाठी ज्येष्ठ लेखक व दिग्दर्शक संतोष पवार यांची प्रमुख भूमिका असणारे “यदा कदाचित रिटर्न” हे सध्याच्या राजकीय घडामोडींवर हसत खेळत चिमटे घेणारे आणि ‘शेतकरी आत्महत्या’ या विषयावर मार्मिक भाष्य करीत प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे नाटक सादर करण्यात आले.आमदार सुनील शेळके यांनी सांगितले की, मावळ सारख्या दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांना येण्या जाण्यासाठी रस्ते नाहीत. अनेक ठिकाणी दळणवळण व्यवस्था नाही. ज्या शाळेत पाच शिक्षक पाहिजेत, तिथे एक, दोन शिक्षक काम करून विद्यार्थी घडविण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत. हे प्रशंसनीय आहे. गुरुजनांना आदर्श स्थानी मानून विद्यार्थी घडत असतात अशा गुरुजनांचा उचित गौरव अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद करीत आहे हे कौतुकास्पद आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले म्हणाले की, शिस्तबद्ध पद्धतीने ध्येय प्राप्तीसाठी शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. नैतिकतेचे आचरण करणारी सुसंस्कृत पिढी घडवण्यासाठी शिक्षक आयुष्यभर कष्ट करीत असतात. अशा गुरुजनांचा गौरव पिंपरी चिंचवडचे सांस्कृतिक मंत्री म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर करतात अशा सुंदर कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी दिल्याबद्दल ॲड. भोसले यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

सुहास जोशी, राजू बंग, संतोष गायकवाड, मुकुंद तनपुरे, शिवाजी ठाकर, तानाजी शिंदे, गणेश धिवार, संतोष राणे, गोरख जांभुळकर, सुहास धस, उमेश माळी, संजय ढोले, संतोष शेठे, प्रमोद भोईर, अंकुश येवले, संजय ठाकर, नारायण गायकवाड, यशवंत काळे, धीरजकुमार जानराव, अतुल वाघ, रघुनाथ मोर, राहुल जाधव, गोकुळ लोंढे, अंकुश मोरे, गंगासेन वाघमारे, अजिनाथ शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.प्रास्ताविक राजू भेगडे, सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शिवणेकर आणि आभार अमोल चव्हाण यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments