Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीमाझ्या मुलाला मी गायक करणार नाही-सोनू निगम

माझ्या मुलाला मी गायक करणार नाही-सोनू निगम

17 November 2020.

माझ्या मुलाला मी गायक करणार नाही. किमान भारतात तरी त्याने काम करू नये अशी माझी इच्छा आहे, असं मत गायक सोनू निगमने व्यक्त केलं आहे. ‘लोकसत्ता’ने ही बातमी दिली आहे.

सोनू निगमचा नवा म्युझिक अल्बम लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे. या आगामी अल्बममधील ‘ईश्वर का वो सच्चा बंदा’ या हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. त्यावेळी त्याने हे वक्तव्य केलं आहे.

“खरं सांगायचं तर त्याने व्यवसायिक गायक होऊ नये अशी माझी इच्छा आहे. अन् व्हायचंच असेल तर त्याने भारतात काम करू नये असं वाटतं. तो भारतात राहात नाही तो सध्या दुबईमध्ये आहे. त्याने तिथंच करिअर करावं असं वाटतं. त्याला गाण्याची आवड आहे. तो देखील खूप छान गातो. पण त्याला गाण्यापेक्षा अधिक गेमिंग करायला आवडतं. मला वाटतं त्याने आपलं करिअर निवडलं आहे,” असं सोनूने म्हटलं आहे.

यापूर्वी सोनूने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर देखील टीका केली होती. अभिनय क्षेत्रात घराणेशाही तर आहेच, परंतु ही परंपरा आता संगीतच्या दुनियेतही सुरु झाली आहे, असं मत गायक सोनू निगमने व्यक्त केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments