Sunday, June 15, 2025
Homeअर्थविश्वगुंठेवारीत घर नियमित करायचंय.. वाचा हे नियम

गुंठेवारीत घर नियमित करायचंय.. वाचा हे नियम

राज्यशासने ऑगस्ट 2001 मध्येच गुंठेवारी नियमितीकरण कायदा केला आहे. त्यामुळे येत्या काळात शहरातील जवळपास 2 लाख बांधकामे नियमित होणार आहेत. नियमितीकरणासाठी फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

या प्रकारची बांधकामे होणार नियमित या कायद्यानुसार परवानगी न घेता बांधलेली , चटई क्षेत्र निर्देशांक , बांधकामाची परवानगी न घेता बांधलेली बाधकामे विविध आरक्षणावर नसलेली बांधकामांचे नियमितीकरण होणार आहे.

इथे मिळावा अर्ज गुंठेवारीतील बांधकामासाठी महानगरपालिकेने प्रभागामध्ये नागरी सुविधा केंद्रे सुरु केली आहेत. त्या केंद्रांमध्ये नागरिकांना गुंठेवारी नियमितीकरणाचे अर्ज मिळणार आहेत. या ठिकाणाहून अर्ज घेतल्यानंतर नागरिकांनी अर्ज भरून इथेच जमा करणे अपेक्षित आहे. याबरोबरच नागरिकांना अर्ज करताना शुल्क भरावे लागणार आहे. प्रति अर्ज 100 रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे. याबरोबरच नागरिकांना महानगरपालिकेच्या संकेत स्थळावरही अर्ज करता येण्याची सुविधा उपलब्ध आहे.

बांधकामाच्या नियमितीकरणासाठी ही कागदपत्रे आवश्यक मालकी हक्कासाठी सातबारा व इतर कागदपत्रे,

मार्च 2021 अखेर मालमत्ता कर भरल्याची पावती,

मार्च 2021 अखेर पाणी बिल भरल्याची पावती.

ड्रेनेज कनेक्शन पूर्णत्वाचा दाखला .

इमारतीचा प्लॅन, क्रॉस सेक्शन, इलेव्हेशन व लोकेशन प्लॅन,

नकाश्यावर मालोक व आर्किटेक्चरची सही बंधनकारक ,

मान्यताप्राप्त स्टक्चरल इंजिनिअरकडून स्टक्चरलस्टॅबिलिटीचा दाखला.

या बांधकामांचे नियमितीकरण होणार नाही या नियमानुसार 31 डिसेंबर 2020 पर्यंतची गुंठेवारीतील घरे नियमित केली जाणार आहेत. ज्या जमिनी अतिक्रमणाखाली आहेत, अथवा विशिष्ट क्षेत्राखाली आहेत. म्हणजे ना – विकास क्षेत्र, ना हरित क्षेत्र, ना पर्यटन क्षेत्र, ना पर्यटनदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र, त्यानंतर संरक्षण विभागावाचे क्षेत्र गुंठेवारीत नियमित होणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments