Saturday, March 22, 2025
Homeक्रिडाविश्वIPL-2020 सुपर ओव्हरमध्ये दिल्लीचा पंजाबवर विजय

IPL-2020 सुपर ओव्हरमध्ये दिल्लीचा पंजाबवर विजय

२१ सप्टेंबर २०२०,
दिल्ली आणि पंजाब यांच्यातील सामना चांगलाच रोमहर्षक झाला. कारण हा सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला होता. दोन्ही संघांना २० षटकांमध्ये १५७ धावा करता आल्या. सुपर ओव्हरमध्ये कागिसो रबाडाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. कागिसो रबाडाने सुपर ओव्हरमध्ये दोन विकेट्स मिळवत फक्त दोन धावा दिल्या. त्यामुळे दिल्लीला सुपर ओव्हरमध्ये सहज विजय साकारता आला.

दोन्ही संघांनी २० षटकांमध्ये १५७ अशा समान धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता. पण रबाडाने सुपर गोलंदाजी करत दिल्लीला एकहाती विजय मिळवून दिला.पंजाबकडून मयांक अगरवालने ८९ धावांची धडेकाबाज खेळी साकारली, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. स्टॉइनिसने तुफानी फटकेबाजी करत २० चेंडूंत आपले अर्धशतक साजरे केले आणि त्यामुळेच दिल्लीच्या संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यश आले. स्टॉइनिसने २१ चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५३ धावा केल्या. त्याच्या या दमदार फटकेबाजीमुळे संघाला १५७ धावा उभारता आल्या.

दिल्लीच्या संघाकडून वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने भेदक मारा केला. आर. अश्विनने या सामन्यात एकच षटक टाकले असले तरी त्याने दोन फलंदाजांना बाद केले. पण या षटकानंतर दुखापत झाल्यामुळे अश्विन खेळू शकला नाही. दिल्लीचा दुसरा फिरकीपटू अक्षर पटेलने अचूक मारा केला. अक्षरने आपल्या चार षटकांमध्ये फक्त १४ धावा देत एका फलंदाजाला बाद केले.

पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दिल्लीच्या संघाला सुरुवातीलाच तीन धक्के दिले. शमीच्या गोलंदाजीवर शिखर धवन शून्यावर आऊट झाला. त्यानंतर शमीने पृथ्वी साव आणि शेमरॉन हेटमायर यांनाही स्वस्तात तंबूचा रस्ता दाखवला आणि दिल्लीच्या संघाला पिछाडीवर ढकलले. शमीने भेदक गोलंदाजी करत यावेळी दिल्लीची अवस्था ३ बाद १३ अशी केली होती.

दिल्लीची ३ बाद १३ अशी अवस्था असताना कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी दिल्लीचा डाव सारवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी रचली. पण त्यानंतर फक्त एका धावेच्या अंतराने हे दोघेही बाद झाले आणि दिल्लीच्या संघाला मोठा धक्का बसला. शमीने पुन्हा एकदा दमदार गोलंदाजी करत श्रेयस अय्यरला बाद केले. श्रेयसने यावेळी ३९ आणि पंतने ३१ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर मार्कस स्टॉइनिसने काही जोरदार फटके लगावले. त्यामुळे दिल्लीच्या संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. स्टॉइनिसने फटकेबाजी केली नसतील तर दिल्लीच्या संघाला १२० धावांचा पल्लाही गाठता आला नसता. स्टॉइनिसच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीला दिडशेपेक्षा जास्त धावा करता आल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments