Thursday, September 28, 2023
Homeबातम्यामी खुल्या मनाच्या राजकारणाची वारसदार-पंकजा मुंडे

मी खुल्या मनाच्या राजकारणाची वारसदार-पंकजा मुंडे

२५ ऑक्टोबर २०२०,
मी खुल्या मनाच्या राजकारणाची वारसदार आहे असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. मी गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या भाषणांची जुगलबंदी पाहिली आहे. मोठमोठ्या नेत्यांची भाषणं ऐकली आहेत. या गोष्टी राजकारणाचा भाग आहेत असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर पंकजा मुंडे यांना शिवसेनेची ऑफर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान आज भगवानगडावरुन पंकजा मुंडे या महाराष्ट्राला संबोधित करणार आहे.

विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर चार ते पाच महिन्यांचा मोठा ब्रेक मिळाला आहे. ऊसतोड कामगार आणि इतर सर्वच गोष्टींवर मला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. मी स्वतः भगवान गडावर दर्शनला निघाली आहे. माझ्यासोबत काही कार्यकर्तेही असतील त्या सर्वांसोबत मी निघाली आहे. भगवानगडावरुन मी ऑनलाइन संवाद साधणार आहे. लोकांना तिथे न येण्याचं आवाहनही मी केलं आहे असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना शिवसेनेनं पक्षात येण्याची ऑफर दिली होती. या ऑफरवर पंकजा मुंडे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. मी खुल्या मनाच्या राजकारणाची वारसदार आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान प्रीतम मुंडे यांची प्रकृती ठीक नसल्याचीही चर्चा आहे यावर त्यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या प्रीतम मुंडे यांना ताप आला आहे. त्यांची कोविड टेस्टही करण्यात आली पण ती निगेटिव्ह आली आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याबाबतही त्यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या की एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणं ही गोष्ट माझ्यासाठी दुःखाची आहे. याबाबत धक्का बसला आहे असं त्या म्हणाल्या. टीव्ही नाईन मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments