Wednesday, June 18, 2025
Homeगुन्हेगारीमी अहमदाबाद सिपी विजयसिंग बोलतोय…. पोलीस निरीक्षकांकडेच पैशांची मागणी; गुन्हा दाखल…

मी अहमदाबाद सिपी विजयसिंग बोलतोय…. पोलीस निरीक्षकांकडेच पैशांची मागणी; गुन्हा दाखल…

मी अहमदाबाद सिपी विजयसिंग बोलतोय, माझ्या मोबाईल क्रमांकावर पेटीएम, गुगल पे कर’, असे म्हणत आरोपीने फिर्यादी पोलीस निरीक्षकांकडे फोनद्वारे पैशांची मागणी केली. तसेच, पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे आपले मित्र असल्याचे सांगितले.

फिर्यादी आणि अन्य पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल क्रमांकावर पेटीएम, गुगलपेद्वारे आत्तापर्यंत २४ हजार रुपये पाठवले आहेत. मात्र, त्याच्या बोलण्यावरून संशय आल्याने फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार देऊन चिंचवड ठाण्यात गुन्हा नोंदवला.

आरोपीने काहीजणांना आपण पोलिसांचा बातमीदार आहे, असे सांगूनही अनेक पोलिसांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. हा प्रकार ८ ते २८ डिसेंबर रोजी चिंचवड येथे घडला आहे. पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, खान (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments