आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्यासह त्यांचे पती आणि मुलाला अटक करण्यात आली आहे. दिनांक १० जून रोजी सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणी प्रियांकाचे वडील अनिल घोलप यांनी आळंदी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
प्रियांका घोलप ही पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेविका कमल घोलप यांची मुलगी होती. नोव्हेंबर २०२१मध्ये महिन्यात प्रियांकाचा विवाह अभिषेक उमरगेकर यांच्यासोबत झाला होता. परंतु विवाहाच्या काही महिन्यातच प्रियांकाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, त्यांचे पती अशोक (वय 60 वर्षे) यांनी सुनेचा छळ केला आणि त्यांना मुलगा अभिषेकने (वय 27 वर्षे) साथ दिली. लग्नानंतर लगेचच सासरच्यांनी मुलीचा संसारोपयोगी साहित्य तसंच फर्निचर कधी आणणार यावरुन शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. त्यातूनच प्रियांका उमरगेकरने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यानुसार आळंदी पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाय हुंड्यासाठी पैशांची मागणी केली जात होती, असंही गुन्ह्यात नमूद आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
प्रियांका आणि अभिषेक यांच्यात रविवारी (10 जुलै) वाद झाला होता. दोघांमध्ये वाद झाल्यांतर बेडरुमध्ये जाऊन प्रियांकाने रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालात प्रियांकाने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं