Tuesday, July 16, 2024
Homeसंपादकीयशंभराव्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची पिंपरी चिंचवडकरांना मेजवानी

शंभराव्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची पिंपरी चिंचवडकरांना मेजवानी

शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन येत्या ६ व ७ जानेवारी २०२४ रोजी उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी -चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आले आहे. हे शतक महोत्सवी नाट्य संमेलन असल्याने वैशिष्टपूर्ण असणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या नाट्य संमेलनात जवळपास ६४ कलांचा समावेश असलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मुलाखती, परिसंवाद, एकांकिका,प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांची रेलचेल असणार आहे. श्री मोरया गोसावी संकुल, केशवनगर चिंचवड येथे या नाट्य संमेलनाचा मुख्य सभा मंडप असणार आहे. तर बालनाट्य नगरी, भोईर नगर येथे आहे शिवाय पिंपरी -चिंचवड शहरातील चार नाट्यगृहांमध्ये वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम व नाटकांची मेजवानी रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे, अशी माहिती नाट्य संमेलनाचे आयोजक, अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी – चिंचवड शाखेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, धारिवाल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चे संचालक प्रकाश धारिवाल, अ. भा. मराठी नाट्य परिषद पिंपरी शाखेचे कार्याध्यक्ष राजेश साकला, अ. भा. मराठी नाट्य परिषद पिंपरी शाखेचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सचिन इटकर, राजेंद्र शिंदे, सुनिल महाजन, सुहास जोशी,पिंपरी चिंचवड महापलिका आयुक्त शेखर सिंह, कलारंग प्रतिष्ठान, नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, नाट्य संमेलन संयोजन समितीचे पदाधिकारी प्रणव जोशी, आकाश थिटे, मनोज डाळीम्बकर आणि सदस्य उपस्थित होते.

बालनाट्य मंडप, भोईर नगर -५ जानेवारी २०२४ शुक्रवार (पूर्वसंध्या)
रंगमंच उद्घाटन कार्यक्रम – सायं. ५ ते ५.१५
हस्ते – खासदार सुप्रिया सुळे,
विश्वस्त – शशी प्रभू, डॉ. रवि बापट, मोहन जोशी, अशोक हांडे, डॉ. गिरीश गांधी.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कार्यकारी समिती : प्रशांत दामले, अध्यक्ष, भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष (उपक्रम), नरेश गडेकर, उपाध्यक्ष (प्रशासन)
अजित भुरे, प्रमुख कार्यवाह, सतीश लोटके, कोषाध्यक्ष, विजय चौघुले, संमेलन समिती प्रमुख, सुनील ढगे, सहकार्यवाह, दिलीप कोरके, सहकार्यवाह, समीर इंदुलकर,
नाटक – दशावतार – आर एम डी इंटरनॅशनल (सी बी एस ई) – सायं. ५.३० ते ६.३०
विठ्ठल तो आला आला- ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय – सायं ६.१५ ते ७.३०

रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड- ५ जानेवारी २०२४
सायं. ५:३०-८:३० व्यावसायिक नाटक – अस्तित्व

मुख्य सभामंडप
नाट्य दिंडी- ६ जानेवारी (सकाळी ७ वा.) आरंभ : मोरया गोसावी मंदिर भैरवनाथ मंदिर गांधी पेठ चाफेकर चौक- भोई आळी – पॉवर हाऊस चौक – तानाजी नगर काकडे पार्क- मुख्य सभा मंडळ मोरया गोसावी क्रीडांगण.

उद्घाटन सोहळा, मुख्य सभामंडप (सकाळी ११ वा.)
प्रेमानंद गज्वी (अध्यक्ष, ९९ वे अ.भा. मराठी नाट्य संमेलन) यांच्या उपस्थितीत. यावेळी प्रमुख पाहुणे शरद पवार (स्वागताध्यक्ष), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शतकोत्सवी अ.भा. मराठी नाटय संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, मुख्य निमंत्रक उद्योग मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या उपस्थित होणार असून प्रमुख अतिथी म्हणून अभिनेते नाना पाटेकर, डॉ. पी डी पाटील, प्रकाश धारीवाल आदी उपस्थित राहणार आहेत.

शिवराज्याभिषेक (प्रभो शिवाजी राजा-१५० कलाकारांसह)- ३५० वर्षपूर्ती निमित्त (सायं. ४ ते ५:१५)
संगीत कार्यक्रम (रात्री ६. ३० ते ८. ३०)

बालनाट्य नगरी, भोईर नगर – ६ जानेवारी
उदघाटन कार्यक्रम – दुपारी ३ ते ४
हस्ते : अभिनेत्री निलम शिर्के सामंत, अभिनेत्री सविता मालपेकर, प्रकाश पारखे, सचिन भोसले, बाळासाहेब भोसले, सुलभा उबाळे, सचिन चिखले, कविता अल्हाट.
गजरा नाट्य छटांचा (सायं. ४ ते ४. ४५)
क्लाउन माईम ‌ॲक्ट (सायं. ५ – ६)
व्यावसायिक बालनाट्य – बोक्या सातबंडे (सायं ६.३० ते ८.३०)

प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड -६ जानेवारी
उद्‌घाटन कार्यक्रम – गणेश वंदना (दु. २ ते २.१५)
हस्ते : खासदार श्रीरंग बारणे, पिं. चिं. भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप
नियमक मंडळ सदस्य – दिलीप कोरके, सुनील ढगे
प्रायोगिक नाटक – पुनरुत्थान (दु. २. ३० ते ४. ३०)
एका लग्नाची पुढची गोष्ट (सायं ५ ते ८ )
संगीत नाटक – कट्यार काळजात घुसली (रात्री ९ ते ११)

अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी -६ जानेवारी
रंगमंच उद्घाटन कार्यक्रम – (दु. ३.३० ते ३.४५)
हस्ते : खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार महेश लांडगे,
नियमक मंडळ सदस्य – अजित गव्हाणे, दादा साळुंखे, विशाल शिंगाडे
व्यावसायिक नाटक – ‘करून गेला गाव’ (सायं. ५ ते ८ )
व्यावसायिक नाटक – मर्डरवाले कुलकर्णी (रात्री. ९ ते १२)

ग. दि. माडगूळकर- मुख्य रंगमंच, निगडी -६ जानेवारी
रंगमंच उ‌द्घाटन कार्यक्रम – गणेश वंदना (दु. २ ते २. ३०)
हस्ते : आमदार आण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे
नियमक मंडळ सदस्य – नरेश गडेकर, संतोष लोटके
नाटक – जोडी तुझी माझी (दु. २. ३० ते ३:३०)
हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम (सायं. ४ ते ७ )
संगीत नाटक – संगीत सौभद्र (सायं ८ ते ११ )

ग. दि. माडगूळकर- निकट रंगमंच, निगडी -६ जानेवारी
रंगमंच उद्‌द्घाटन कार्यक्रम – गणेश वंदना (दु. ३:३० ते ३. ४५ )
हस्ते : आमदार आण्णा बनसोडे,
नियामक मंडळ सदस्य : दीपक रेगे, समीर हंपी, सत्यजित धांडेकर
प्रायोगिक नाटक-दैवी एक रहस्य – (दु. ४ ते ७ )
एकांकिका: सिनेमा (सायं.७ ते ८ )
एकांकिका – चित्रंगदा – ( रात्री ८ ते ९)
एकांकिका: हॅलो इंस्पेक्टर (रात्री ९ ते १०)
एकांकिका: फेलसेफ (रात्री १०:०० ते ११)

निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव- ६ जानेवारी
रंगमंच उ‌द्घाटन कार्यक्रम – (दु. ३. ३० ते ३. ४५)
हस्ते : आमदार अश्विनी जगताप, आमदार सुनील शेळके
नियामक मंडळ सदस्य – सुशांत शेलार, संजय देशपांडे
व्यावसायिक नाटक – तुझे आहे तुजपाशी (सायं ५ ते ८ )
व्यावसायिक नाटक – दादा एक गुडन्यूज आहे (रात्री ९. ते १२)

मुख्य सभा मंडप -७ जानेवारी २०२४, रविवार
गणेश वंदना (स. ९ ते ९. ३०)
परिसंवाद व कार्यक्रम (स. १० ते ११ . ३०)
प्रकट मुलाखत (सायं ३ ते ५)
नाट्य संमेलन हस्तांतर सोहळा (सायं ५ ते ७)
प्रमुख अतिथी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र साहित्य परिषद कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कैलास कदम, शंकर जगताप, सचिन भोसले, धम्मराज साळवे, तुषार कामटे, सचिन चिखले, निलेश तरस, चेतन बेंद्रे, राजेंद्र मुथा, स्वप्नील कांबळे, चंद्रकांत लोढे, राजेंद्र जैन.
संगीत रजनी – अवधूत गुप्ते – रात्रौ ८ पासून पुढे

बालनाट्य नगरी, भोईर नगर-७ जानेवारी
माझी माय -( सकाळी ९:०० ते ९:४५)
ढब्बू ढोल रिमोट गोल (सकाळी १० ते १२)
पपेट शो – पपेटरी हाऊस मुंबई (दु. १२. १५ ते १२. ४५)
गोष्ट रंग (दु. २ ते २.४५ )
गोष्ट सिम्पल पिल्लाची – ग्रीपस थिएटर (सायं ३:३० ते ४:००)
बालगीते – ( सायं ५ ते ६)

प्रा.रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड -७ जानेवारी
गणेश वंदना (सकाळी ९ ते ९. ३०)
व्यावसायिक नाटक – अमेरिकन अल्बम (दु. ११ ते २)
व्यावसायिक नाटक – खरं खरं सांग (सायं. ५ ते ८ )
प्रायोगिक नाटक-शहर कुंभकर्ण (रात्री ९ ते १२)

अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी -७ जानेवारी
गणेश वंदना (स. ९ ते ९.३०)
लावणी महोत्सव (दु. १०. ३० ते १२. ३०)
भारुड – डॉ भावार्थ देखणे ( दु.३ ते ४:३०)
विशाल शिंगाडे (सायं. ५ते ८)
लोकधारा (रात्री ९ ते १२)

ग. दि. माडगूळकर १, निगडी – ७ जानेवारी
काव्य-पहाट आणि कविता (सकाळी ६ ते ९)
गणेश वंदना (स. ९ ते ९. ३०)
प्रायोगिक नाटक – तेरवं (सकाळी १० ते १२)
प्रायोगिक नाटक – उच्छाद (दुपारी १ ते ३)
तपस्विनी नृत्य कार्यक्रम (दुपारी ३. १५ ते ३. ३०)
व्यावसायिक नाटक- घाशीराम कोतवाल (सायं. ५ ते ८)
प्रायोगिक नाटक – गुड बाय किस (रात्री ९ ते १२)

ग. दि. माडगूळकर- निकट सभामंडप, निगडी -७ जानेवारी
एकांकिका : सय – सरी (सकाळी ९ ते १०)
प्रायोगिक नाटक: क्लिक माईम अॅक्ट (सकाळी १० ते १२)
एकांकिका: परमेश्वर . कॉम (दुपारी १:०० ते २:००)
एकांकिका: अ डील (सायं. २ ते ३ )
एकांकिका: बीइंग अँड नथिंग (सायं.३ ते ४)
एकांकिका: मसनातलं सोनं (सायं. ४:०० ते ५)
एकांकिका: कूपन (रात्री ५ ते ६)
प्रायोगिक नाटक – तप्तपदी -( सायं ७ ते १०)

निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव- ७ जानेवारी
गणेश वंदना (सकाळी ९ ते ९. ३०)
जोडी तुझी माझी – मुलाखत कार्यक्रम (सकाळी १०. ३० ते १२. ३०)
व्यावसायिक नाटक – गेम ऑफ पॉवर (दुपारी १.३० ते ४.३०)
व्यावसायिक नाटक – चाणक्य (सायं. ५. ३० – ८. ३०)
प्रायोगिक नाटक – रा था (मध्य प्रदेश) (रात्री ९ ते १२)

मुख्य सभामंडपात दुसऱ्या दिवशी ७ जानेवारी २०२४ रोजी, दु ३: ३० वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘नाटक आणि मी’ ही खास मुलाखात होणार असून ठाकरे यांच्याशी दीपक करंजीकर संवाद साधणार आहेत.

संमेलन हस्तांतरण सोहळा
रविवार, दिनांक ७ जानेवारी २०२४, सायं ५ वाजता
प्रमुख अतिथी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

नाट्यसंमेलनामधील सर्व सभागृह व प्रवेशद्वार यांना देण्यात आलेली नावे पुढीलप्रमाणे :

मुख्य सभामंडप,
उदघाटन व हस्तांतरण कार्यक्रम स्थळ, काकडेपार्क, चिंचवडगाव

पहिली कमान : क्रांतिवीर चापेकर बंधू प्रवेशद्वार
महन साधू मोरया गोसावी प्रवेशद्वार
‘सूर्यमाला सभामंडप’
आद्यनाटककार विष्णुदास भावे रंगमंच

बालनाट्यरंगभूमी, भोईरनगर
‘बालनाट्यरंगभूमी नंदनवन सभामंडप’
प्रेक्षक प्रवेशासाठी : कै. राजा गोसावी प्रवेशद्वार
कलाकार प्रवेशासाठी : कै. रत्नाकर मतकरी प्रवेशद्वार
कै. सुधाताई करमरकर रंगमंच

प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवडगाव
प्रवेशद्वार – कै. धोंडूतात्या चिंचवडे
कै. पद्माकर कुलकर्णी रंगमंच

नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, सांगवी
कै. रामचंद्र देखणे, प्रवेशद्वार
कै. पु. ल. देशपांडे रंगमंच

कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी
कै. शाहीर योगेश विष्णुरकर प्रवेशद्वार
कै. शाहीर साबळे रंगमंच

ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी
ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, मुख्य रंगमंच
प्रमुख प्रवेशद्वार : कै. अण्णासाहेब मगर प्रवेशद्वार
कै. विक्रम गोखले रंगमंच

ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निकट रंगमंच
कै. दत्ता मिरजकर रंगमंच या प्रमाणे कार्यक्रम होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments