दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. या दोघांनी त्यावर मौन बाळगले असले तरी ते अनेकदा एकमेकांबरोबर दिसत असल्यानं ही चर्चा सुरूच आहे. आता पुन्हा एकदा हे दोघं लंच डेटला एकत्र गेले होते. यावेळी दोघांबरोबर त्यांचे कुटुंब असल्यानं पुन्हा एकदा त्यांच्या डेटिंगच्या चर्चेला उधाण आलं आहे.
दाक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना एकेकांना डेट करत असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. ते दोघंजण अनेकदा एकत्र दिसतात. कधी लंचला, कधी डिनरला तर कधी एकत्र सुट्ट्या घालवण्यासाठी परदेशी जातानाही दिसतात. त्यामुळे ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अर्थात त्यावर त्या दोघांनी काहीही भाष्य केलेलं नाही. आता त्या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये रश्मिका विजय दोघंजण लंच डेटला गेले आहेत. परंतु यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे मित्रमंडळी आणि घरातील काही सदस्य देखील दिसत आहे. त्यामुळे दोघांच्या घरी लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रश्मिका आणि विजय एका कॅफेमध्ये त्यांच्या मित्रमंडळींबरोबर आणि काही कुटुंबियांबरोबर मौजमजा करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दिग्दर्शक गौतम तिन्नानुरी, आनंद देवरकोंडा, शेर्या वर्मा दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून विजय आणि रश्मिकाच्या घरी दोघांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली असणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना डेटिंग
विजय आणि रश्मिका हे एकमेकांबरोबर अनेकदा लंच, डिनरला जाताना दिसतात. एकत्र फिरतानाही दिसतात. त्या दोघांचे काही कॉमन मित्रमंडळी आहेत. तसंच दोघांच्या कुटुंबामध्ये ही सलोख्याचे संबंध आहेत. रश्मिकाचा भाऊ आणि विजय एकेकांचे चांगले मित्र आहेत. रश्मिका आणि विजयचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.
अनेकदा एकत्र दिसतात रश्मिका-विजय
रश्मिका आणि विजय हे अनेकदा एकत्र दिसतात. डिनर, लंचबरोबर अनेक कार्यक्रम आणि पार्ट्यांनाही ते एकत्र जातात. इतकंच नाही तर सुट्ट्या देखील ते एकत्र घालवतात. त्यांच्या रिलेशनशिपबद्दल त्यांनी कधीही उघडपणं भाष्य केलेलं नाही. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत असंच ते कायम सांगतात. परंतु त्यांच्या चाहत्यांच्या नजरेतून त्या दोघांमध्ये असलेलं खास बाँडिग लपून राहिलेलं नाही.
विजय आणि रश्मिकानं डियर कॉमरेड आणि गीता गोविंदम या सिनेमांत एकत्र काम केलं आहे. या दोघांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. खऱ्या आयुष्यातही त्यांची जोडी जुळावी अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.