सलमान खानला मी पुन्हा कधीच भेटायला आवडणार नसल्याचे अभिनेत्रीने स्पष्ट केलं.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा दंबग चांगलाच गाजला होता. दबंग नंतर ‘दबंग २’ आणि ‘दबंग ३’ लाही प्रेक्षकांची चांगला प्रतिसाद दिला होता. ‘दबंग ३’ ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. मात्र, दबंग ३ मधील अभिनेत्रीने सलमान खानच्या रक्षकांवर गंभीर आरोप केले आहेत. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीने केलेल्या या गंभीर आरोपांची चर्चा सुरु आहे.
हेमा शर्माने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे. हेमा म्हणाली, “मला दबंग 3 मध्ये मला काम करायचे होते. त्या चित्रपटात काम करण्यासाठी जेवढं काही शक्य आहे ते सर्वकाही केले कारण मला सलमान खान सरांना भेटायचे होते. माझा पहिला सीन सलमान सरांबरोबर होता. त्यामुळे या संधीचा मला खूप आनंद झाला. मात्र, तो सीन सलमानशिवाय शूट करण्यात आला. त्यामुळे माझी खूप निराशा झाली. हेमा म्हणाली, ‘शूट संपल्यानंतर मला एकदा सलमान सरांना भेटायचे होते.’ सलमान खानला भेटण्याची संधी मिळावी यासाठी मी अनेक लोकांशी बोलले. ‘सलमान सरांना भेटण्यासाठी मी ५० लोकांशी बोलले.”
हेमा म्हणाली. यानंतर मी पंडित जनार्दन यांची भेट घेतली आणि सलमान सरांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी मला आश्वासन दिले आणि आम्ही सलमान सरांना भेटायला गेलो. पण तिथे माझ्याशी किती वाईट वागणूक आणि अपमान झाला हे मी सांगू शकत नाही. मला श्वानासारखे बाहेर फेकले गेले कारण मला त्यांच्याबरोबर एक फोटो काढायचा होता. सुमारे १०० लोकांसमोर माझा अपमान झाला, ज्यात मला वैयक्तिकरित्या ओळखणाऱ्या अनेकांचा समावेश आहे. या घटनेनंतर मी १० दिवस झोपू शकले नाही. सलमान सर घटनास्थळी उपस्थित नव्हते, पण ते आजूबाजूला होते, त्यांना हवे असते तर ते हस्तक्षेप करू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे सलमान खान सरांना पुन्हा कधीही भेटायला मला आवडणार नाही.”