Sunday, December 3, 2023
Homeताजी बातमीतेलंगणाचे मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, आमदारांसह खासदारांनी घेतलं नामदेव पायरीचं दर्शन

तेलंगणाचे मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, आमदारांसह खासदारांनी घेतलं नामदेव पायरीचं दर्शन

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांनी विठुरायाचे दर्शन घेतलं आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांनी आज विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत काही सहकाऱ्यांनी देखील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं. तर मंत्र्यांसह, आमदार खासदारांना मात्र बाहेरुनच नामेदव पायरीचे दर्शन घ्यावं लागलं. पंढरपुरात वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यामुळं मोजक्याच कोअर कमिटीच्या लोकांनी के चंद्रशेखर राव यांच्यासोबत मंदिरात सोडण्यात आलं होतं.

आमदार आणि खासदारांनी घेतलं नामदेव पायरीचं दर्शन

केसीआर (KCR) यांचे काल सोलापुरात (Solapur) आगमन झालं होतं. त्यांच्यासोबत त्यांचं आख्ख मंत्रिमंडळ सोलापुरात आले होते. आज सकाळी केसीआर यांचा ताफा पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेन रवाना झाला होता. त्यानंतर पंढरपूरमध्ये केसीआर यांनी श्री विठ्ठलाचं दर्शन घेतलं आहे. आमदार आणि खासदारांनी आणि मंत्र्यांनी नामदेव पायरीचे दर्शन घेतलं. दरम्यान, केसीआर यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. मंदिर परिसरात वारकऱ्यांची मोठी गर्दी आहे. या वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर परिसरात मोठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती या पक्षाचा मोठा विस्तार करण्याची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांची योजना आहे. त्यासाठी ते दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी सुरु झालेल्या केसीआर यांच्या या दौऱ्याला मोठं महत्व प्राप्त झालं आहे. तेलंगणातून तब्बल 600 गाड्यांचा ताफा महाराष्ट्रात दाखल झाला आहे.

थोड्याच वेळात भगीरथ भालकेंचा BRS मध्ये प्रवेश

विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर तलेंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा ताफा पंढरपूरहून सरकोलीच्या दिशेनं निघाला आहे. थोड्याच वेळीत केसीआर यांचे तिथे आगमन होणार आहे.

सरकोली इथं शेतकरी मेळावा होमार आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांचा BRS मध्ये प्रवेश होणार आहे. केसीआर यांच्या स्वागतसाठी भागीरथ भालके यांच्याकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या स्वागतासाठी गुलाबाच्या पायघड्या आणि अबकी बार किसान सरकारचा रांगोळीतून संदेश देण्यात आला आहे. केसीआर यांचे विठ्ठल-रखुमाईची मूर्ती, तुळशीहार, टाळ-चिपळ्या आणि वीणा देऊन केसीआर यांचे स्वागत केलं जाणार आहे. सर्व आमदार आणि मंत्र्यांना देखील विठ्ठलाची मूर्ती दिली जाणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments