Sunday, December 3, 2023
Homeउद्योगजगतसिंहगडावर जाण्यासाठी पुन्हा ई-बस सेवा

सिंहगडावर जाण्यासाठी पुन्हा ई-बस सेवा

सिंहगडावर जाण्यासाठी पुन्हा ई-बस सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वन विभाग आणि पीएमपी प्रशासनाच्या बैठकीनंतर पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी घाट रस्त्याची पाहणी केली.

सिंहगडावर जाण्यासाठी पुन्हा ई-बस सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वन विभाग आणि पीएमपी प्रशासनाच्या बैठकीनंतर पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी घाट रस्त्याची पाहणी केली. रस्ता, चार्जिंग स्थानके आणि संरक्षक भिंत दुरुस्तीनंतर सेवा सुरू करण्यात येईल, असे संकेत पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आले.

सिंहगड येथे जाण्यासाठी खासगी वाहनांचा बंदी घालताना ई-बस सेवा सुरू करण्यात आली होती. त्यासाठी ई-बस चार्जिंग सुविधाही विकसित करण्यात आली होती. तसेच डोणजे येथे वाहनतळ विकसित करण्यात आला होता. पर्यटकांचाही या सेवेला प्रतिसाद मिळत होता. मात्र अरूंद रस्ता, दरड कोसळण्याच्या घटना, अपुरी चार्जिंग स्थानके आणि अपघातांमुळे ही सेवा काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली होती. मात्र ही सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने पीएमपी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली आणि पीएमपी अधिकाऱ्यांकडून घाट रस्त्याची पाहणी केली. नव्याने चार्जिंग स्थानके उभारण्यात आल्यानंतर आणि पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्यानंतर ही सेवा सुरू करण्याचे संकेत पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी दिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments