Wednesday, February 21, 2024
Homeगुन्हेगारीपुण्यात धक्कादायक घटना, आंबेगाव तालुक्यात चार नराधमांकडून महिलेवर सामूहिक अत्याचार

पुण्यात धक्कादायक घटना, आंबेगाव तालुक्यात चार नराधमांकडून महिलेवर सामूहिक अत्याचार

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असणाऱ्या घोडेगाव गावाजवळ असणाऱ्या अज्ञात ठिकाणी नेऊन चौघांनी मिळून एका महिलेवर आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यातल्या याचं प्रमाण पुण्यात जास्त आहे. तसेच, बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असणाऱ्या घोडेगाव गावाजवळ असणाऱ्या अज्ञात ठिकाणी नेऊन चौघांनी मिळून एका महिलेवर आळीपाळीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण आंबेगाव तालुका हादरला आहे. या प्रकरणात घोडेगाव पोलिसांनी चौघांपैकी एकाला ताब्यात घेतलं आहे. याबाबत घोडेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि.२३) रोजी पीडित महिला आकाश चंद्रकांत भालेराव या त्यांच्या प्रियकरासोबत मोटारसायकल वरून अज्ञात ठिकाणी जात होते. त्यावेळी मोटरसायकल वरून संदेश अशोक जाधव, संजय आणि आदेश अशोक जाधव हे तिघे आले. त्यांनी महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अंगावरील कपडे काढून आळीपाळीने सामूहिकरीत्या बलात्कार केला. “याबाबत जर कोणाला सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही”, अशी धमकी दिली.

मात्र, महिलेने तात्काळ घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांना आपबीती सांगितली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत चौघांविरोधत तक्रार दाखल केली. यातील आकाश चंद्रकांत भालेराव याला पोलिसांनी पकडले असून तिघांचा तपास सुरू आहे. सदर गुन्हा पोलीस उपनिरीक्षक महेश पवार यांनी दाखल केला आहे. तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची टीम करत आहे.

या घटनेनं आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घोडेगाव पोलिसांनी गँग रेपचा गुन्हा दाखल केला असून घोडेगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments